जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यातील सर्व ९५२ गावांमध्ये हे कार्यक्रम झाल्याचा दावा महसूल विभागाचा आहे. राजस्व अभियानांतर्गत जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, शिधापत्रिकांचे वाटप, शेतशिवारात कृषी विभागाच्या सहाय्याने शिवारफेरी करून सातबारा व इतर कागदपत्रांची माहिती देणे, शेतशिवारात पाणंद रस्ते निर्मिती आदी कार्यक्रम घेण्यात आले. या अंतर्गत नंदुरबार तालुक्यात १५५, नवापूर तालुक्यात १६५, तळोदा ९४, अक्कलकुवा १९४, शहादा १८० तर धडगाव तालुक्यात १९९ कार्यक्रम आतापर्यंत झाले आहेत. या अंतर्गत आठ हजारांच्या जवळपास दाखले व चार हजार शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. तहसील कार्यालय स्तरावर हे कार्यक्रम राबवण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष नव्याने सुरू होत असल्याने विद्यार्थी वर्गाला दाखल्यांची आवश्यकता भासणार आहे. यातून अशा प्रकारची शिबिरे अडचणी दूर करणारे ठरतील.
दाखल्यांसाठी अभियान सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST