पथराई शिवारातून विद्युत खांबांसह तारा लांबवल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:46 IST2019-07-14T12:46:37+5:302019-07-14T12:46:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील पथराई शिवारातून 8 हजार 400 रुपयांच्या वीज तारा आणि 10 पोल लांबवल्याची घटना ...

पथराई शिवारातून विद्युत खांबांसह तारा लांबवल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील पथराई शिवारातून 8 हजार 400 रुपयांच्या वीज तारा आणि 10 पोल लांबवल्याची घटना मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या उघडकीस आली़ याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आह़े
पथराई शिवारातील शेताचा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर कंपनीच्या कर्मचा:यांकडून नियमित तपासणी सुरु करण्यात आली होती़ दरम्यान 10 पोल आणि वीज तारा चोरीला गेल्याचे दिसून आले होत़े याप्रकरणी बापू गिण्या पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल मोरे करत आहेत़ तारा आणि खांब यांची एकूण किंमत ही आठ हजार 400 रुपये असल्याची माहिती देण्यात आली आह़े अवजड असे हे साहित्य शेतशिवारातून चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आह़े वीजपुरवठा खंडीत झाल्याने शेतक:यांचे नुकसान होत आह़े