एस.टी. बस व खाजगी बसच्या अपघातात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:52 PM2019-05-24T12:52:15+5:302019-05-24T12:52:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी :  धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुरुवारी पहाटे साडेतीन  वाजेच्या सुमारास एस.टी. बस व खाजगी ...

S.T. One injured in bus and private bus accident | एस.टी. बस व खाजगी बसच्या अपघातात एक जखमी

एस.टी. बस व खाजगी बसच्या अपघातात एक जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी :  धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुरुवारी पहाटे साडेतीन  वाजेच्या सुमारास एस.टी. बस व खाजगी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एस.टी. बसचालक जखमी झाला. 
पोलीस सूत्रांनुसार, धुळे-सुरत महामार्गावर सोनखांब ते पानबारा गावाच्या दरम्यान गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सुरतकडे जाणारी जालना-सुरत बसला (क्रमांक एम.एच. 20 बी.एल. 2880) धुळ्याकडे जाणा:या खाजगी लक्झरी बसने (क्रमांक जी.जे.03 बी.डब्ल्यू. 9596) धडक दिली. या अपघातात बस चालक आर.आर. शेख किरकोळ जखमी झाले. मात्र दोन्ही वाहनांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.  या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद झाली असून तपास हवालदार भीमसिंग ठाकरे करीत आहेत.


 

Web Title: S.T. One injured in bus and private bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.