सातपुडा कारखान्यात स्पिरीट उत्पादनास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 03:09 PM2020-01-20T15:09:26+5:302020-01-20T15:09:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा कारखान्याचा उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीत नवीन लावण्यात आलेल्या मल्टीप्रेशर प्लान्ट निर्मित रेक्टीफाईड स्पिरीटचे पहिले ...

Spirit production started at Satpuda factory | सातपुडा कारखान्यात स्पिरीट उत्पादनास सुरूवात

सातपुडा कारखान्यात स्पिरीट उत्पादनास सुरूवात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सातपुडा कारखान्याचा उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीत नवीन लावण्यात आलेल्या मल्टीप्रेशर प्लान्ट निर्मित रेक्टीफाईड स्पिरीटचे पहिले टँकर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आले.
या वेळेस कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, संचालक एकनाथ पाटील, शशिकांत पाटील माजी नगराध्यक्ष विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, प्राज कंपनीचे साईट इन्चार्ज सुमित कुलकर्णी, प्रोसेस इन्चार्ज सौरभ शर्मा, गिरीष यादव, बृहनकरण शुगर सिंडीकेट प्रा.लि. बॉटलींग मॅनेजर वरपे, डिस्टीलरी विभागाचे मॅनेजर के.बी. पाटील, असि. डिस्टीलरी मॅनेजर प्रविण सराफ, अ‍ॅडी.चिफ इंजिनिअर धनंजय शेटे, विठ्ठल बेंद्रे, जनरल मॅनेजर अशोक पाटील, चिफ इंजिनिअर संजय चौधरी, सिव्हील इंजिनिअर शरद पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत टँकर रवाना करण्यात आला.
सातपुडा कारखान्याचे व्यवस्थापन सुरूवातीपासूनच स्व.अण्णासाहेब पी.के. पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत साखर कारखान्यातील बदल असोत की, उपपदार्थ प्रकल्पातील बदल हे नेहमीच केले जातात. त्यानुसार सातपुडा कारखान्याचा डिस्टीलरी विभागात नवीन मल्टीप्रेशर प्लान्टची अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाने निर्मित ५५ केएलपीडी क्षमतेचा पुणे येथील सुप्रसिद्ध प्राज इंडस्ट्रीज लि. या कंपनीकडून उभारणी करण्यात आली असून, त्यातून निर्मित अत्यंत क्वॉलिटीचे रेक्टीफाईड स्पिरीटचे पहिले टँकर रवाना करण्यात आले असून, देशीमद्य बनविणारी नाशिक येथील बृहनकरण शुगर सिंडीकेट प्रा.लि. या मद्य निर्मिती प्रकल्पास हे उत्पादन पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी दिली.
एवढ्यावरच न थांबता १० टनी हायप्रेशर बॉयलर व गॅसफायर तसेच एक मेगावॅट क्षमतेचे पावर टर्बाइन सुद्धा घेण्यात आले असून, संपूर्ण डिस्टीलरीसाठी लागणारी वीज त्यातून निर्माण होईल व पुरुषोत्तमनगर येथील कर्मचारी व अधिकारी यांच्या वसाहतीलादेखील येथूनच वीजपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे वीज खरेदी करण्यावर जो खर्च होत होता त्याच्यात फार मोठी बचत होणार असल्याचेदेखील माहिती कार्यकारी संचालक पाटील यांनी दिली.

Web Title: Spirit production started at Satpuda factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.