शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

‘गुटख्याच्या पुडी’मुळे सोनवद येथे मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:34 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मानवी शरीरासाठी हानीकारक असलेल्या गुटख्यामुळे सोनवद ता़ शहादा येथील जातीय सलोखा धोक्यात आला आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मानवी शरीरासाठी हानीकारक असलेल्या गुटख्यामुळे सोनवद ता़ शहादा येथील जातीय सलोखा धोक्यात आला आह़े गुटखा पुडी मागण्यावरुन दोन गटातील  वादाचे पर्यावसन हाणामारीत होवून गावात तणाव निर्माण झाला़ रविवारी साडेदहा वाजता हा प्रकार घडला होता़ सोनवद येथे रविवारी रात्री  विशाल महेंद्र महिरे याच्याकडून  शांतीलाल ऊर्फ भैय्या धोंडू पाटील याने गुटखा पुडी मागितली होती़ यातून दोघांमध्ये वाद झाला़ वादादरम्यान शांतीलाल पाटील याने जातीवाचक बोलून अपमानास्पद शब्द वापरल़े दरम्यान शिवाजी माधवराव पाटील, सोन्या अंकुश पाटील यांनी विशाल महिरे यास मारहाण करत शांतीलाल याच्या घरार्पयत नेल़े त्याठिकाणी पुन्हा मारहाण करण्यात आली़ याठिकाणी मदतीसाठी आलेल्या इतरांनाही उपस्थितांकडून दमदाटी करण्यात आली़ घटनेनंतर सोमवारी सायंकाळी शहादा पोलीस ठाण्यात विशाल महिरे याने दिलेल्या फिर्यादीवरुन शांतीलाल पाटील, शिवाजी पाटील, सोन्या पाटील, जितेंद्र सुरेश पाटील, दिपब बाजीराव पाटील, शरद बाबूराव पाटील, रावश्या शेपा पाटील, पप्प्या प्रकाश पाटील, बंटी प्रकाश पाटील, विजय दशरथ पाटील, अमोल दशरथ पाटील, ज्ञानेश्वर दौलत पाटील, सतीष निंबा पाटील गोपाल शरद पाटील यांच्याविरोधात अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दरम्यान याप्रकरणी दुस:या गटाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार कालू ऊर्फ विशाल महेंद्र महिरे, सागर महेंद्र महिरे, छोटू पुंजू महिरे, भीला बंडू सावळे यांनी सोनवद गावातील महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संशयितांनी महिलेच्या पतीस डोळ्यावर मारुन दुखापत करत महिलेसोबत लज्जा येईल असे कृत्य केल्याने पिडितेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश पाटील करत आहेत़ हाणामारीच्या या घटनेनंतर सोनवद गावात तणाव निर्माण झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सिताराम गायकवाड यांनी भेट देत पोलीस बंदोबस्त तैनात केला़ दरम्यान याठिकाणी शांतता आह़े अॅट्रॉॅसिटी अॅक्टंतर्गत दाखल गुन्ह्यातील संशयितांचा पोलीसांकडून शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आह़े सोमवारी गुन्हा दाखल होत असताना दोन्ही गट पोलीस ठाण्यात पुन्हा समोरासमोर आले होत़े समज देऊनही ऐकत नसल्याने पोलीस बळाचा वापर करत त्यांच्यावर नियंत्रण मिळवल़े याप्रकरणी दोन्ही गटातील सागर महिरे, विशाल महिरे, शांतीलाल पाटील, दिपक पाटील यांच्याविरोधात पोलीस नाईक विनोद पाटील यांच्या फिर्यादीवरुन सार्वजनिक शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल आह़े