शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

मुले पळविण्याच्या अफवांना पायबंदसाठी समाज घटकांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 13:05 IST

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने मुले पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून अनेक गावांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्यातून अनेक निदरेष लोकांना मारही खावा लागला आह़े या घटना थांबता थांबेना अशी अवस्था झाल्याने आता या अफवा रोखणार कोण असाच प्रश्न निर्माण झाला आह़े मुले पळवून ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने मुले पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून अनेक गावांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्यातून अनेक निदरेष लोकांना मारही खावा लागला आह़े या घटना थांबता थांबेना अशी अवस्था झाल्याने आता या अफवा रोखणार कोण असाच प्रश्न निर्माण झाला आह़े मुले पळवून नेणारी टोळी परिसरात फिरत असून त्यापासून नागरिकांनी सावध रहावे असा मेसेज सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांसून व्हायरल झाला आह़े ही चर्चा सुरू असतानाच मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरात नागरिकांनी रात्रीची गस्त गावागावात सुरू केल्याची बातमी आली, नव्हे तर संशयावरून दोन जणांना ठार मारल्याची घटनाही घडली़ या वृत्ताची चर्चा होत असतानाच नंदुरबार शहरात रेल्वेस्थानकावर बालकाला उचलून पळ काढला होता़ त्यातून चर्चेला बळ मिळाले त्यापाठोपाठ शहरातील सिंधी कॉलनीतही अशीच घडली़ त्यानंतर गुजरातच्या सिमेवर नवापूर तालुक्यात गडद येथे अफवेतूनच दोन जणांना बेदम मारहाण करण्याची घटना घडली़ नंदुरबार शहरात पुन्हा एका शिक्षिकेलाच या अफवेचा बळी ठरवण्यात आल़े त्यानंतर म्हसावद ता़ शहादा येथील घटनेनेतर सर्वानाच आवक केल़े याठिकाणी चारचाकी वाहनावर लोकांनी संताप काढला़ त्यातील तिघांना रक्तबंबाळ केल़े आणि गाडीच पेटवून दिली़ या घटनेचे वृत्त गावोगावी चचर्िेले जात नाही तोच घोटाणे ता़ नंदुरबार येथे पुन्हा अशाच अफवेतून चक्क साधूंनाच पकडून बेदम मारल़े ब्राrाणपुरी ता़ शहादा येथे एका बहुरूप्याला चोप देण्यात आला़ अशा गावोगावी घटना घडत असल्याने अफवेचे लोण किती खोलवर रूजले असल्याची प्रचिती येत आह़े विशेष म्हणजे एवढय़ा सा:या घटना घडत असताना राजकारणी, प्रशासन, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी अजूनही हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले नाही़ अफवा थांबवून गावोगावी जनजागृतीबाबत ठोस प्रयत्न सुरू झालेले नाहीत़ पोलीस प्रशासनाच्या गावोगावी घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यातच दमछाक होत आह़े त्यामुळे एकूणच जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत असल्याचे चित्र आह़े प्रत्येक गावात, चौकाचौकात, टोळ्याटोळ्याने बसलेल्या नागरिकांमध्ये फक्त मुले पळवून नेणा:या टोळीचीच आणि घडणा:या घटनांचीच चर्चा आह़े यातील बहुतांश जण या अफवा असल्याचे मान्य करतात़ पण गावात अशी अफवा आली की, सारेच त्यामागे पळतात़ आणि कायदा हातात घेऊन संशयितांवर तुटून पडतात़ एकूणच या अफवांमुळे सर्वानाच हकनाक त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे आता गावोगावी जागरूक नागरिकांनी लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आह़े अशी अफवा जर कोणी पसरवत असेल तर त्याचाही स्थानिक स्तरावरच बंदोबस्त करावा़ गावागावात अनेक अनोळखी व्यक्ती या-ना त्या निमित्ताने फिरत असून त्यामुळे यापूर्वी चोरीच्या व फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत़ अशा घटनाही या अफवेला बळ देणा:या ठरल्या असल्या तरी नागरिकांनी थेट कायदा हातात न घेता एखाद्यावर संशय आल्यास त्याची विचारपूस करावी व त्यातून काही संशयित माहिती मिळाल्यास पोलीसांशी संपर्क करावा़ पण शांतता टिकवण्यासाठी मात्र सर्वानीच प्रयत्न करणे आवश्यक आह़े  लोकांनी व्हायरल झालेल्या व्हॉटस व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये, अनोळखी इसमांना मारहाण करून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, संशय असल्यास पोलीसांना माहिती द्यावी़ वाढीस लागलेले हे प्रकार थांबवण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस पाटील आणि कोतवाल यांना दवंडी देऊन जनजागृती करण्याचे सूचित केले आह़े पोलीस दलाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आह़े असल्याचे पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले. एखाद्या घटनेबाबत वारंवार चर्चा व अफवा सुरू झाल्यास त्याबाबत एक समाजमन तयार होत़े आणि त्यामुळे अफवांच्या चर्चेलाही महत्त्व प्राप्त होत़े व लोक तशी कृती करू लागतात़ तशातलाच हा प्रकार आह़े मुले पळवून नेणा:या टोळीबाबत मोठय़ा प्रमाणावर चर्चा झाल्याने लोकांमध्ये भिती निर्माण झाली आह़े ही भिती दूर करण्यासाठी आता व्यापक जनजागृतीची आवश्यकता आह़े त्यासाठी गावोगावी लोकांमध्ये जाऊन लोकांच्या मनात असलेली भिती दूर करणे गरजेचे असल्याचे मानसशास्त्रज्ञ प्रा़ राजेश मेश्राम यांनी सांगितले.