शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

सहा नव्या रेल्वेगाड्या सुरू, परंतु सर्वच आरक्षित असणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST

०९३१४ बांद्रा भुसावळ खान्देश स्पेशल एक्स्प्रेस ७ मार्च २०२१ पासून मंगळवार, गुरुवार आणि रविवारी धावणार आहे. ही एक्स्प्रेस ...

०९३१४ बांद्रा भुसावळ खान्देश स्पेशल एक्स्प्रेस ७ मार्च २०२१ पासून मंगळवार, गुरुवार आणि रविवारी धावणार आहे. ही एक्स्प्रेस रात्री १२ वाजून २० मिनिटांनी बांद्रा येथून प्रस्थान करून नंदुरबार येथे सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी आगमन करणार असून, ८ वाजून ३८ मिनिटांनी भुसावळकडे प्रस्थान करणार आहे. परतीच्या प्रवासाला ही एक्स्प्रेस त्याचदिवशी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी भुसावळ येथून प्रस्थान करणार आहे, तर नंदुरबार येथे रात्री ८ वाजून ५५ मिनिटांनी आगमन करून रात्री ९ वाजता मुंबईच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. ही एक्स्प्रेस संपूर्ण आरक्षित असून, एकूण १५ कोच असणार आहेत. प्रवाशांना आरक्षण करून प्रवास करता येणार आहे. या एक्स्प्रेसला दोन्ही बाजूनी बांद्रा, बोरिवली, विरार, पालघर, वलसाड, नवसारी, भेस्तान, बारडोली, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ येथे थांबे असणार आहे.

०९१२५ सुरत-अमरावती सुपरफास्ट द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस २६ फेब्रुवारी २०२१ पासून शुक्रवार आणि रविवारी धावणार आहे. ही एक्स्प्रेस दुपारी १२ वाजून २०मिनिटांनी सुरत येथून प्रस्थान करून नंदुरबार येथे दुपारी २ वाजून ४६ मिनिटांनी आगमन करेल, तर २ वाजून ५१ मिनिटांनी अमरावतीच्या दिशेने प्रस्थान करेल, तर परतीच्या प्रवासाला ०९१२६ अमरावती-सुरत एक्स्प्रेस शनिवारी आणि सोमवारी दुपारी ४ वाजून ३२ मिनिटांनी नंदुरबार येथे आगमन करून दुपारी ४ वाजून ३७ मिनिटांनी सुरतकडे प्रस्थान करेल. ही एक्स्प्रेस संपूर्ण आरक्षित असून, दोन्ही बाजूने सुरत, उधना, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती येथे थांबणार आहे.

व्यतिरिक्त पश्चिम रेल्वेने १ मार्च २०२१ पासून दररोज ०९४८३ अहमदाबाद बौरोनी एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एक्स्प्रेसमुळे खांदेश भाग हा मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ आणि पर्यटन स्थळ खजूराहोशी जोडला जाणार आहे. ही एक्स्प्रेस दररोज धावणार आहे.

ही एक्स्प्रेस अहमदाबादवरून रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी प्रस्थान करून सकाळी ८ वाजता नंदुरबार येथे आगमन, तर ८ वाजून १० भुसावळच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. परतीच्या प्रवासाला ०९४८४ बौरोनी अहमदाबाद एक्स्प्रेस सकाळी ६ वाजता नंदुरबार येथे आगमन करून सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी अहमदाबादच्या दिशेने प्रस्थान करेल. या एक्स्प्रेसला अहमदाबाद, आनंद, वडोदरा, सुरत, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावळ, खंडवा, इटारसी, हबीबगंज, बिना, छत्तरपूर, खजूराहो, चित्रकूट, माणिकपूर, प्रयागराज, प. दीनदयाळ उपाध्याय टर्मिनल, दानापूर, मुझ्झफरपूर, समस्तीपूर आणि बौरोनी येथे थांबे असणार आहेत, तर जळगाव येथील थांबा मात्र वगळण्यात आला आहे.

०९०७७ नंदुरबार-भुसावळ पॅसेंजर नंदुरबारवरून दररोज दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी प्रस्थान करेल, तर भुसावळ येथे सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी आगमन करेल, तर परतीच्या प्रवासाला ०९०७८ भुसावळ नंदुरबार पॅसेंजर भुसावळवरून सकाळी ९ वाजता प्रस्थान करून दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी नंदुरबार येथे आगमन करेल. ही पॅसेंजर पूर्णपणे आरक्षित असून, प्रवाशांना तिकीट आरक्षित करून प्रवास करता येणार आहे.

पॅसेंजरला दोन्ही बाजूनी नंदुरबार, चौपाळे, तिसी, रनाळे, दोंडाईचा, विखरण, सिंदखेडा, होळ, नरडाणा, बेटावद, पाडसे, भोरटेक, अमळनेर, टाकरखेडे, धरणगाव, चावलखेडे, पाळधी, जळगाव, भुसावळ थांबे असणार आहे.

०९००७ सुरत भुसावळ एक्स्प्रेस ही दररोज धावणार असून, सायंकाळी ५ वाजता सुरतवरून प्रस्थान करेल, तर नंदुरबार येथे रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी आगमन करेल आणि रात्री ९ वाजता भुसावळच्या दिशेने रवाना होईल. परतीच्या प्रवासाला ०९००८ भुसावळ सुरत एक्स्प्रेस भुसावळवरून रात्री ८ वाजून २०मिनिटांनी प्रस्थान करून रात्री १२ वाजून ५२ मिनिटांनी नंदुरबारला आगमन करेल, तर रात्री १२ वाजून ५७ मिनिटांनी सुरतकडे रवाना होईल. ही पॅसेंजर पूर्णपणे आरक्षित असून, प्रवाशांना तिकीट आरक्षित करून प्रवास करता येणार आहे. या एक्स्प्रेसला दोन्ही बाजूनी सुरत, उधना, चलथान, बगुमरा, गंगाधरा, बारडोली, मढी, व्यारा, सोनगड, नवापूर, खांडबारा, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ थांबे असतील.