शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
7
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
8
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
9
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
10
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
11
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
12
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
13
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
14
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
15
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
16
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
17
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
18
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
19
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
20
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली

खडकी रस्त्यावर जीप अपघातात सहा मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST

हे सर्व मजूर खडकी, ता. धडगाव येथून रोजगारासाठी गुजरात राज्यातील साखर कारखान्यात जाणार होते. शनिवारी सकाळी सात वाजेच्या ...

हे सर्व मजूर खडकी, ता. धडगाव येथून रोजगारासाठी गुजरात राज्यातील साखर कारखान्यात जाणार होते. शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या जीपमध्ये ३० प्रवासी बसले. प्रवास सुरू झाल्यानंतर तोरणमाळ-खडकी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर जीप आली असता तोरणमाळ येथील खडकी पॉइंटपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर जीप सुमारे ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळली. यात सहा प्रवासी जागीच मृत झाले असून अनेक गंभीर झाले आहेत. विशेष म्हणजे प्रवाशांनी खचाखच भरलेली ही जीप दरीत कोसळण्यापूर्वी अनेकांनी गाडीबाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला.

तोरणमाळ येथील खडकी पॉइंटपासून सुमारे २०० मीटर अंंतरावरील घाटरस्त्यात तीव्र चढाव आहे. एका वळणावर वाहनचालकाचा ताबा सुटल्याने ही जीप खोल दरीत प्रचंड वेगाने पडली. या अपघातात जीपगाडीचे पूर्ण नुकसान झाले असून चारही बाजूने गाडी पूर्णपणे उलटल्याने फुटली आहे. जीपचे इंजिन, दरवाजे व इतर स्पेअर पार्ट अस्ताव्यस्तपणे आजूबाजूला पडले होते. अपघाताची भीषणता एवढी भयावह होती की, संपूर्ण दरीतून जखमी प्रवाशांच्या किंकाळ्या, आरडाओरड व रडारडीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

खडकी गावातून सकाळी सात वाजता निघाल्यानंतर खडकी पॉइंटजवळ अवघ्या काही मिनिटात हे सर्व प्रवासी पोहोचणार होते. खडकी पॉइंट येथून तोरणमाळपर्यंत सपाटीचा रस्ता आहे. मात्र त्यापूर्वीच जीप घाटात कोसळली व काळाने या सर्वांवर घाला घातला. अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी खडकी पॉइंट ते तोरणमाळ असे सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी पळत जाऊन तोरणमाळ गावात पोहोचल्यानंतर तेथील नागरिकांना अपघाताची माहिती दिल्यानंतर तोरणमाळचे माजी सरपंच पहाडसिंग नाईक, जयसिंग चौधरी, जीवन रावताळे, करमसिंग चौधरी, सायसिंग रावताळे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.

अतिशय खोल दरी असल्याने येथील जखमी व मृत प्रवाशांना दरीतून वर आणण्यासाठी बचाव पथकाला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली. कुठलीही साधन सुविधा नसताना तोरणमाळच्या ग्रामस्थांनी वनविभाग, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळेल ते साधन साहित्याचा वापर करून जखमींना दरीतून बाहेर काढले व मृत प्रवाशांचे पार्थिव बाहेर काढले.

या अपघातात चिमा धीसा नाईक (३५), बाईजीबाई रेलसिंग नाईक (३८), कुचलीबाई रेलसिंग नाईक (१८), रिमाबाई रायसिंग नाईक (९), सेकडीबाई सायसिंग नाईक (४५), रिंगाटीबाई चिमल्या नाईक (२५) हे सहा मजूर प्रवासी मृत झाले असून त्यात पाच महिलांचा समावेश आहे.

तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल जखमींमध्ये जामा रायसिंग चौधरी (१९), मेलसिंग रायसिंग नाईक (१९), सुनील रायसिंग नाईक (१७), रुमाल्या बागल्या नाईक (६५), शर्मिला चिमा नाईक (३वर्षे), रायमल खेड्या नाईक (५०), चोमा धिसा नाईक (४५), कालसिंग वांग्या नाईक (७०), आमश्या गोरख्या नाईक (३०), कैलास रायसिंग नाईक (२५), विजय रायसिंग नाईक (१५) यांचा समावेश आहे.

तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलेल्या गंभीर जखमींमध्ये सुनीता सायसिंग नाईक (१५), गणेश रेवज्या रावताळे (२८), रायमल वेल्या नाईक (५०), गोरख्या नाईक (५वर्षे), बायसिंग नाईक (५वर्षे), वांग्या नाईक (४०), गोहऱ्या बाया नाईक (५५) या गंभीर जखमींना डोक्याला, छातीला व मणक्यांंना गंभीर मार लागला असून काहींचे हात व पायांची हाडे मोडल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी त्वरित पाठविण्यात आले आहे.