शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

अक्कलकुव्यात सिङोरियन प्रसुतीची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:11 PM

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात सिङोरियन शस्त्रक्रियेचे सूविधा उपलब्ध करण्यात आाली आहे. त्यामुळे आतार्पयत पाच महिलांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात सिङोरियन शस्त्रक्रियेचे सूविधा उपलब्ध करण्यात आाली आहे. त्यामुळे आतार्पयत पाच महिलांची यशस्वी सिङोरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली आहे. अक्कलकुवा हा तालुका दुर्गम व अतिदुर्गम भागात विखुरला आहे.  दुर्गम भागात गरोदर मातांच्या प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत निर्माण झाली तर तिला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात हलविण्यात येत होते.  अनेकदा यात दुर्लक्ष किंवा  दिरंगाई झाल्यास गरोदर माता किंवा बाळ दगावण्याची शक्यता असते. शिवाय यात नागरिकांना मोठा  आर्थिक फटका बसत होता. परंतु अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात गुंतागुंतीची सिङोरियन शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे तालुक्यातील दुर्गम व दुर्गम भागातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे.अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात सिङोरियन शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध झाल्यानंतर पाच   गरोदर मातांच्या यशस्वी सिङोरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. त्यात रायसिंगपूर व खटवणी येथील दोन महिलांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. पहिल्या महिलेच्या पोटात पाणी       कमी होते व दुस:या महिलेचे  बाळ नियोजित कालावधीपेक्षा जास्त दिवसाचे होते. सोनोग्राफी रिपोर्ट वरून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय स्त्री रोगतज्ञ डॉ. गिरीष  तांबोळी यांनी घेतला. त्यांना बालरोगतज्ञ डॉ. सुजित पाटील, भुलतज्ञ डॉ. अंकुश परदेशी यांचे सहकार्य लाभेल.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गणेश पवार यांच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालयात सिङोरियन शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध झाली आहे. यामुळे अतिदुर्गम भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.