शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

सामूहिक विवाह सोहळ्यात 17 जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 6:05 PM

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादा : समस्त लेवा पाटीदार गुजर समाज, गुजर समाज मंचतर्फे चौथा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादा : समस्त लेवा पाटीदार गुजर समाज, गुजर समाज मंचतर्फे चौथा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी लहान शहादा येथे उत्साहात झाला. या सोहळ्यात 17 जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. या सोहळ्यात तीन राज्यातील सुमारे 20 हजार समाज बांधवांनी  उपस्थिती लावली होती.नंदुरबार तालुक्यातील लहान शहादा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयापासून सजविण्यात आलेल्या वाहनातून वरांची सकाळी नऊ वाजता मिरवणूक काढण्यात आली. 10 वाजता सर्व वर विवाहस्थळी दाखल झाले. या ठिकाणी 17 जोडप्यांचा ब्राम्हवृदांच्या मंगलाष्टकांनी व शहनाईच्या मंद सुरात उत्साहात शुभमंगल सोहळा झाला. याप्रसंगी खासदार डॉ.हिना गावीत, सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, आमदार के.सी पाडवी, जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी रोहयो व पर्यटन विकास तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मोबाईलचा माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला.सोहळ्यास अखिल भारतीय लेवा पाटीदार समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा कमलताई पुरुषोत्तम पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, नंदुरबारचे नगराध्यक्ष परवेज खान, देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत, साने गुरुजी विद्यालय प्रसारक संस्थेचे समन्वयक मकरंद पाटील, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे  सभापती सुनील पाटील, जिज्ञासा दीदी, जिल्हा परिषदेचे माजी  उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, नगरसेविका ज्योती पाटील, सुनील पटेल,            महेंद्र पाटील, जगदीश पाटील, अॅड.प्रभाकर पाटील, रघुनाथ पाटील, महेंद्र पाटील, मुरार पाटील, दशरथ पाटील, माधवी पटेल, प्रीती पाटील, वसंत पाटील, संजय पाटील, डॉ.सविता पाटील, गिरीश     महाराज, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून समस्त लेवा पाटीदार गुजर समाज, गुजर समाज मंच व विविध शहरे ग्राम गुजर मित्र मंडळाच्या वतीने तयारी करण्यात येत होती. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून 20 हजारांवर व:हाडी या सोहळ्याचे साक्षीदार झाले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोहळा पार पडला. या वेळी समशेरपूर येथील राकेश पाटील व निझर येथील मुकेश पाटील या नवरदेवांनी पाणी वाटप करून श्रमदान केले.समाजातील युवकांकडून या कार्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला. या विवाह सोहळ्याकरीता विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात स्वागत समिती, भोजन समिती, मंडप समिती, स्वच्छता समिती, पाणी पुरवठा, इलेक्ट्रिक समिती, ध्वनिक्षेपक समिती, वधू-वर मिरवणूक समिती, सजावट समिती, अकस्मात समिती आदी विविध समित्यांच्या समावेश करण्यात आला होता. या समित्यांच्या माध्यमातून समाजातील 150 युवक- युवतींनी यात हिरीरीने सहभाग घेतला.