आठवडाभरात शिवभोजनही डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:25 AM2020-03-30T11:25:29+5:302020-03-30T11:25:36+5:30

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सर्वसामान्य गरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या शिवभोजनलाही लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका बसला ...

Shivbhojun downstairs during the week | आठवडाभरात शिवभोजनही डाऊन

आठवडाभरात शिवभोजनही डाऊन

Next

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सर्वसामान्य गरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या शिवभोजनलाही लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका बसला आहे. नंदुरबारातील दोन केंद्रात दिवसाला ४०० जणांना जेवन देण्याचे टार्गेट असते. आठवडाभरात ३२०० थाळींपैकी केवळ ६०१ जणांनी जेवन नेले केले. पैकी बाजार समितीतील केंद्र तर सहा दिवसांपासून बंदच आहे. आता लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर एक केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होत आहे.
शिवसेनेची व विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजनाचा आधार लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, घरातून बाहेर न पडू देणे, संचारबंदी यामुळे शिवभोजनकडे अनेकांनी इच्छा असूनही पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवभोजनमधील थाळींची संख्या २५ टक्केही झाली नसल्याचे चित्र आठवडाभराच्या एकुण परिस्थतीवरून दिसून येत आहे.
नंदुरबारात दोन ठिकाणी
नंदुरबारात दोन ठिकाणी शिवभोजन सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात स्त्री शक्ती संघटनेतर्फे तर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समिती प्रशासनातर्फे ते चालविले जाते. दोन्ही ठिकाणी भोजनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अवघ्या १० रुपयात जेवन दिले जाते. एक भाजी, पोळी, दाळ-भात किंवा खिचडी यांचा समावेश आहे.
२० ग्रॅम वजनाच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात व १०० ग्रॅम वरण यांचा समावेश आहे. काही ठिकाणी चालविणाऱ्यांकडून लोणचे किंवा कांदा देखील दिला जातो. प्रत्येकी केंद्रावर २०० जण दिवसातून जेवन करून जातील अशी सोय आहे. त्यासाठी १२ ते २ ही वेळ देण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालय आणि बाजार समिती या दोन्ही केंद्रात सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी स्वतंत्र अ‍ॅप असून त्यात सर्व डाटा संकलीत करावा लागतो.
लॉकडाऊनमुळे परिणाम
मंगळवार २४ मार्च रात्रीपासून देशभरात आणि सोमवार २३ मार्च रात्रीपासून राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. शिवाय २२ मार्च रविवारी जनता कर्फ्यू होता. परिणामी गेल्या आठवडाभरात या योजनेतील थाळींची संख्या कमालीची रोडावली आहे. संचारबंदीमुळे कुणालाही बाहेर निघू दिले जात नाही. त्यामुळे शिवभोजन केंद्रांकडे कुणी फिरकत नाही. परिणामी बाजार समितीमधील केंद्र २२ मार्चपासून बंद करावे लागले आहे.
जिल्हा रुग्णालयातील केंद्र सुरू असले तरी त्या ठिकाणी देखील संख्या मंदावली आहे. गेल्या २१ मार्च रोजी १२३ जणांनी त्या ठिकाणी जेवन केले. परंतु २२ रोजी जनता कर्फ्यूमुळे ते बंद होते. २३ रोजी देखील बंद राहिले. २४ पासून तेथे बसून जेवन करण्यास मनाई करण्यात आली. त्याऐवजी टिफीन देण्यात येवू लागले. त्या दिवशी ३७ जणांनी टिफीन नेला.
२५ रोजी गुढीपाडवा असतांनाही बंद होते. २६ रोजी ३१, २७ रोजी १४२ तर २८ रोजी १६१ जणांनी टिफीन नेला. बाजार समितीतील केंद्रात २१ मार्च रोजी १०७ जणांनी जेवन केले. नंतर २२ मार्च पासून हे केंद्र बंदच झाले. आता ते सुरू करण्यासाठी सुचाना देण्यात येत आहे.

४सर्वसामान्य व उघड्यावर राहणाºयांना सध्याच्या परिस्थितीत शिवभोजन हे मोठा आधार ठरणार आहे. त्यासाठी शासन, प्रशासनही सरसावले आहे.
४शिवभोजनकडे जाणाºयांना संचारबंदी काळात कुठलाही अडथळा आणू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाने आता या केंद्राच्या वेळेत देखील बदल करून ती वाढविली आहे.
४सध्या १२ ते २ ही वेळ होती आता सकाळी ११ ते दुपारी ३ अशी वेळ राहणार आहे. शिवाय दहा ऐवजी पाच रुपये थाळी राहणार आहे. त्यामुळे अनेकांना ते सोयीचे ठरणार आहे. याशिवाय आता नंदुरबार शिवाय शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तालुक्याच्या मुख्यालयी देखील शिवभोजन केंद्र सुरू करण्यात येत आहे.
४१ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. लॉकडाऊनमुळे जास्तीत जास्त निराधार, गरीबांना त्याचा फायदा घेता यावा हा उद्देश त्यामागे आहे.

Web Title: Shivbhojun downstairs during the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.