शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

पाटचारींवरील अतिक्रमणामुळे शहादा पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 13:02 IST

सुनील सोमवंशी ।  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : केवळ पाटचारींचे पाणी शहरातील नागरी वस्त्या आणि रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याने ...

सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : केवळ पाटचारींचे पाणी शहरातील नागरी वस्त्या आणि रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाटबंधारे विभागच शहराच्या दुर्दशेला जबाबदार असून या विभागातर्फे अजूनही कोणतीही उपाययोजना होत नसल्याने हा विभाग किती निद्रीस्त आहे हेच यावरून स्पष्ट होते. शहादा तालुक्यात गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला. 2006 च्या महापुरानंतर गेल्या आठवडय़ात पहिल्यांदाच गोमाई नदीला दोनवेळा पूर आला. गोमाई नदीला पूर आला असला तरी नदीजवळील वसाहत सोडली तर शहरात गोमाईच्या पुराने कुठेही तसूभरही नुकसान झालेले नाही. शहरातील अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी घुसून जे प्रचंड नुकसान झाले, जनतेला जो त्रास झाला तो केवळ पाटचारींचे पाणी शहरात घुसल्यामूळे. शहरातून तीन नाले जातात त्यात एक डोंगरगाव रोडला लागून भाजी मंडई जवळून निघतो. दुसरा नाला जुना मोहिदा रोडकडून सप्तशृंगी मंदिराजवळून निघतो तर तिसरा भेंडवा नाला दोंडाईचा रोड क्रॉस करुन नवीन पोलिस स्टेशनकडून निघतो. हे तिघे नाले शहरातून जात असल्याने पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई करणे आवश्यक असताना पाटबंधारे विभागाने साफसफाई तर दूरच ज्या व्यावसायिकांनी, रहिवाशांनी पाटचा:या बुजून नाल्यांचे अस्तित्वच मिटवून टाकले त्यांच्याकडेदेखील कानाडोळा करुन जबाबदारीतून हात झटकले आहेत. डोंगरगाव पाटचारी लोणखेडा बायपासपासूनच अस्तित्वहिन होत आहे. या पाटचारीलगत असलेल्या व्यावसायिकांनी, हॉस्पिटल चालकांनी, रहिवाशांनी पाटचारीला आपली प्रॉपर्टी समजून पाटचारीमध्ये भराव करुन पाटचारींचे अस्तित्व मिटवल्याने या पाटचारीतील पाण्याला मार्गच नसल्याने हे पाणी रस्त्यावर व वसाहतींमध्ये पसरले. शुक्रवारी पटेल रेसिडेन्सी चौकात  तर कमरेइतके पाणी  साचल्याने चोहोबाजूंची वाहातूक ठप्प झाली. श्रीराम कॉलनी व  परिसरात पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले. न्यायालयात पाणी घुसल्याने फाईली व कागदपत्रे ओली झाली. हेच पाणी पुढे पीपल्स बँकेकडून, दर्गाजवळून दोंडाईचा रोडवर येऊन विश्रामगृह, बाजार समिती व स्टेट बँकेत शिरले. पुढे संभाजी नगर,  विजय नगरला देखील या  पाण्याने वेढा दिला. संभाजी नगरात अनेक घरात पाणी घुसले. मोहिदा रोडवरील नाल्याचे पाणी यशवंत नगर, साईबाबा नगरमध्ये शिरले. पुढे  हेच पाणी जैन प्लाझासमोरून परिसरातील घरांमध्ये शिरले. दोंडाईचारोड जवळून जाणा:या भेंडवा नाल्याच्या पाण्याने नवीन पोलीस स्टेशनसह संपूर्ण परिसरालाच वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. शहरातील या सगळ्या वसाहती, परिसर केवळ पाटचारींच्या पाण्यामुळे प्रभावित झाल्याने नागरिकांचे जीव टांगणीला लागले. पावसाळ्यापूर्वी या पाटचा:यांची साफसफाई करुन पाण्याचा मार्ग मोकळा केला असता तर शहरात हाहाकार उठला नसता. केवळ पाटचा:यांच्या पाण्यामुळे शहर जलमय होऊन नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे एवढी भयंकर आपत्ती शहादेकरांवर आल्यानंतर अजूनही पाटबंधारे विभागाने पाटचारींची साफसफाई न केल्याने पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्यास पुन्हा शुक्रवारसारखीच परिस्थिती येऊ शकते.

संततधार पावसाने शहादा शहरात पाटाचे पाणी शिरून अनेक व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनामार्फत या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. शहादा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाउस सुरु आहे. या पावसाने शहरात बहुतांशी ठिकाणी पाणी साचून राहिले असल्याने त्याचा मोठय़ा प्रमाणात शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे शहरातून गेलेल्या पाटाचे  पाणी डोंगरगाव रस्त्याने वाहून एस.टी. महामंडळाच्या खुल्या जागेतून पिपल्स बँकेजवळून दोंडाईचा रस्त्यावरील दग्र्याच्या शेजारून दोंडाईचा रस्त्यावर येते. त्याचप्रमाणे त्याच्याशेजारील समता भवन रस्त्यावरूनही पाणी नदीच्या स्वरुपात दोंडाईचा रस्त्यावर येते. 8 ऑगस्टच्या रात्री या गल्लीतून नदीच्या स्वरुपात पाणी वाहिल्याने तेथील सर्वच दुकानांमध्ये दोन दिवस पाणी साचून राहिल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी दुकानातील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक सामानांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.  या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.