शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

श्रमदानाद्वारे सात किलोमीटर पाईपलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:11 PM

किशोर मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा किनारी असलेल्या डनेल ग्रामपंचायतीच्या राहीपाडा व हिरहीपाडाच्या ग्रामस्थांनी ...

किशोर मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा किनारी असलेल्या डनेल ग्रामपंचायतीच्या राहीपाडा व हिरहीपाडाच्या ग्रामस्थांनी श्रमदान करून सुमारे सात किलोमीटर अंतरावर पाईप टाकून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. चढउतार असलेल्या भागातून सात-आठ दिवस श्रमदान करून ग्रामस्थांनी ही पाईप लाईन टाकली आहे.अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील डनेल ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या राहीपाडा येथे रस्त्यांची सोय नसल्याने हातपंप टाकता येऊ शकले नाही. नाल्यात विहीर आहे मात्र तीदेखील मार्च महिन्यापासून आटली आहे. हिरहीपाडा येथे असलेला एक हातपंप जेमतेम चालतो. त्यामुळे या पाडय़ांवरील ग्रामस्थांना तीन किलोमीटर अंतरावर मोही सागमणपाडा येथील नाल्यात असलेल्या विहीरीवर पाणी भरण्यासाठी भटकंती करावी लागत होती. यावर उपाय शोधण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत सात किलोमीटर अंतरावर असलेल्या आहुलीच्या ङिा:यातून श्रमदानाने पाईपलाईन करीत डोंगर द:याच्या चढउतार मार्गाने पाणी आणण्याचा विचार केला. येथील ग्रामसेवकांकडे पाईप व इतर साहित्याची मागणी करून दोन्ही पाडय़ातील  ग्रामस्थांनी एकत्र येत सात-आठ दिवस-रात्र राबत 500 मीटरचे 14 बंडल पाईपलाईन जोडत व इतर साहित्याचा आधार देत सात किलोमीटर अंतरावरून पाणी आणले. हे पाणी  राहीपाडय़ाच्या कोरडय़ा  पडलेल्या विहिरीत पाणी सोडले तर  दुस:या हिरहीपाडा येथे पाईपद्वारे पाण्याची सोय केली. या दोन्ही पाडय़ातील ग्रामस्थांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी केलेला प्रय} यशस्वी झाला. त्यासाठी तेजला पाडवी, मानसिंग पाडवी,  सायसिंग पाडवी, अमरसिंग पाडवी, वालसिंग पाडवी, राया पाडवी, कालूसिंग पाडवी, सियाराम पाडवी, रवी पाडवी, आपसिंग पाडवी, भंगा पाडवी यांच्यासह दोन्ही पाडय़ातील युवक व महिलांनी श्रमदान केले.