नवापूरात हाणामारी, सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:11 PM2020-02-28T12:11:47+5:302020-02-28T12:12:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उसनवारीच्या पैशातून दोन गटात झालेल्या मारहाणीत सातजण जखमी झाल्याची घटना नवापूर येथे २६ रोजी ...

Seven injured in Navapur attack | नवापूरात हाणामारी, सात जखमी

नवापूरात हाणामारी, सात जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उसनवारीच्या पैशातून दोन गटात झालेल्या मारहाणीत सातजण जखमी झाल्याची घटना नवापूर येथे २६ रोजी रात्री घडली. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल असून पोलिसांनी दंगलीचा व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
संदीप मुकेश पाटील व स्वप्नील महेंद्र नगराळे यांच्यात उसनवारी पैशांवरून वाद होता. या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. या मारहाणीत संदीप नगराळे, दर्शन राजेश पाटील, विशाल मनोज पाटील, भूषण राजेश पाटील, दर्शन अविनाश हिरे व निखील विरसिंग पाडवी व हर्षल नगराळे आदी जखमी झाले.
दोन्ही गट बसस्थानकासमोरील हॉटेल व बाजार समितीच्या गेटजवळ समोरासमोर आल्यावर एकमेकांशी भिडले. लाठ्या, काठ्या, लोखंडी सळई यांचा मारहाणीत वापर करण्यात आला. याबाबतत संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, स्वप्नील महेंद्र नगराळे व त्याच्या साथीदारांनी मारहाण करून गळ्यातील सोन्याची चेन जबरीने काढून घेतली. तसेच मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून स्वप्नील नगराळे, हर्षल महेंद्र नगराळे, निलेश पांडे, उत्कर्ष विकास बैसाणे, यश वाघ, सलाम घडीयाली, निखील पाडवी सर्व रा.नवापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी फिर्याद निखिल विरसिंग पाडवी यांनी दिली. जिग्नेश आनंदा पाटील, संदीप पाटील, दर्शन राजू पाटील, दर्शन हिरे, प्रदीप मनोज पाटील, भूषण राजू पाटील, विशाल मनोज पाटील व त्याच्या सोबतच्या आठ ते दहा जणांनी जबर मारहाण करून जातीवाचक शिविगाळ केली.
पोलिसात जमावाविरुद्ध दंगल आणि जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक रमेश पवार व सहायक पोलीस निरिक्षक महाजन करीत आहे. याप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Seven injured in Navapur attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.