शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

जिल्ह्यात 51 पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 11:38 IST

सरपंचपदासाठी 231 इच्छुक : सोमवारपासून सुरू होणार अर्ज छाननी

ठळक मुद्दे हॉटेल व्यावसायिकांची दिवाळी शुक्रवारी नामनिर्देशन दाखल केल्यानंतर गावांकडे परतणारे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते यांनी आपला मोर्चा शहराबाहेरील तसेच शहरांमधील हॉटेल्सकडे वळवला होता़ याठिकाणी दिवसभरातील घडामोडींवर चर्चा करत जेवणासह इतर गोष्टींचा आस्वाद घ

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी रात्री उशिरार्पयत अर्ज दाखल करण्याचे कामकाज सुरू होत़े यात 504 सदस्य आणि 185 प्रभागांसाठी 1 हजार 219 तर 51 लोकनियुक्त सरपंच पदासाठी  231 इच्छुकांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहेत़ यातही सात ग्रामपंचायती बिनविरोध ठरणार आह़े जागा तेवढेच अर्ज दाखल झाल्याने नवापूर तालुक्यात गंगापूर, वाटवी, पाडळदे ता़ शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील करणखेडा, सातुर्के, ओसर्ली आणि कानळदा या सात ग्रामपंचायती बिनविरोध ठरतील़  नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे, रनाळे, तलवाडे बुद्रुक, रजाळे, आसाणे, घोटाणे, अमळथे, ओसर्ली, सातुर्खे, तिसी, कानळदे, खैराळे, चौपाळे, कोठडे, धानोरा, करणखेडा, नवापूर तालुक्यातील शेही, भांगरपाडा, नानगीपाडा, अंठीपाडा, खडकी, व:हाडीपाडा, शेगवे, विसरवाडी, खेकडा, वाटवी, वावडी, गंगापूर, शहादा तालुक्यातील कळंबू, खैरवे, धांद्रे, पाडळदे ब्रुद्रुक, बहिरपूर, निंभोरा, बिलाडी त़ह़ अक्कलकुवा तालुक्यातील खापर, पोरांबी, डेब्रामाळ, कुकडीपादर, डनेल, मणिबेली, मोलगी, बिजरीगव्हाण, भगदरी, भाबलपूर, घंटाणी, विरपूर, सोरापाडा, अलीविहिर आणि अक्कलकुवा तर तळोदा तालुक्यात राजविहिर 51 ग्रामपंचायतींसाठी येत्या सात ऑक्टोबर मतदान होणार आह़े दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवारी त्या-त्या तालुका मुख्यालयांमध्ये करण्यात येणार आह़े येत्या 26 सप्टेंबर रोजी नामनिर्देशन माघारी घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर तात्काळ चिन्ह वाटप आणि प्रचाराला सुरूवात होणार आह़े नंदुरबार तालुक्यातील धानोरा, रनाळे, शहादा तालुक्यात धांद्रे, नवापूर तालुक्यात विसरवाडी, खेकडा, वाटवी, शेही तर अक्कलकुवा तालुक्यात मोलगी, भगदरी, खापर आणि अक्कलकुवा ग्रामपंचायत निवडणूक लक्षवेधी ठरत आह़े़ शनिवारी या सर्व ग्रामपंचायतींसाठी  नामनिर्देशन दाखल करणारे उमेदवार व त्यांचे पॅनल प्रमुख यांच्यात बैठका सुरू होत्या़ सोमवारी छाननीनंत होणा:या माघारीसाठी कोणाची मनधरणी करावी, यासह विविध विषयांवर गांभिर्याने चर्चा केल्या गेल्याची माहिती आह़े शनिवारी सकाळपासून मोठय़ा गावांमध्ये वैयक्तिक भेटींवर भर देण्यात आल्याची माहिती आह़े