आधार प्रमाणीकरणात जिल्हा राज्यात दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 09:23 PM2020-10-19T21:23:38+5:302020-10-19T21:23:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणात जिल्हा राज्यात दुसऱ्या ...

Second in the district in Aadhaar certification | आधार प्रमाणीकरणात जिल्हा राज्यात दुसरा

आधार प्रमाणीकरणात जिल्हा राज्यात दुसरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणात जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर आला आहे. तब्बल २४ हजार ८२७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. दरम्यान, अद्याप लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणासाठी सहकार विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत असून गेल्या आठवड्यात १०० शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे आधार प्रमाणिकारण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार ८२७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असून २४ दहजार ६७१ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात १८६ कोटी ४६ लक्ष वितरीत करण्यात आले आहेत. आधार प्रमाणिकरणात नंदुरबार जिल्हा राज्यात ठाणे जिल्ह्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ २९६ खात्यांचे आधार प्रमाणिकरण व्हायचे असून त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्याची मोहिम सहकार विभागाने हाती घेतली आहे. सहकार विभागाचे अधिकारी-कर्मचारी स्वत:च्या वाहनाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
दुर्गम भागातील शेतकऱ्यांचा शोध घेताना अनेक अडचणी येत असतानादेखील ही मोहिम उत्साहाने राबविली जात आहे. काही ठिकाणी स्वत: खर्च करून, तर काही ठिकाणी आपल्या दुचाकीवर बसवून शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण केंद्रापर्यंत नेण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेची माहिती सांगून त्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात येते. जिल्हा सहकार उपनिबंधक अशोक    चाळक, सहायक निबंधक प्रताप पाडवी आणि रणजित पाटील हे स्वत: गावागावात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस असूनही अधिकाऱ्यांनी नवापूर तालुक्यातील धवलीपाडा, रनाळे, भोमडीपाडा, मोगरणी, खांडबारा आणि अक्कलकुवा तालुक्यातील बेडाकुंड, पांढरमती, बर्डी, सालीबार, जांभळी, डाब, तोडीकुना या गावांना भेटी देऊन आधार प्रमाणिकरणाचे काम केले. बऱ्याच ठिकाणी शेतकरी अशिक्षित असल्याने त्यांना योजनेची माहिती देताना अडचणी येतात. त्यावरही मात  केली आहे. 

मयत शेतकऱ्याच्या वारसदार नोंदीनंतर योजनेचा लाभ...
भेटी दरम्यान काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या वारसदाराची नोंद करण्याची प्रक्रीयादेखील सुरू करण्यात आली आहे. वारसदार नोंदीनंतर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेचे लाभार्थी आणि बँक खाते असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचे आधार प्रमाणिकरण करून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा सहकार विभागाचा प्रयत्न आहे.

शेतऱ्यांना शोधणे, त्यांना समजावणे हे काम कठीण आहे. पण कर्जमुक्त झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचाही उत्साह वाढतो. सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देऊन नंदुरबारला पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न आहे.
-अशोक चाळक, जिल्हा सहकार उपनिबंधक, नंदुरबार.

Web Title: Second in the district in Aadhaar certification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.