शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

अश्व सौंदर्य स्पर्धेत ‘सौरभ’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये अदंत मादी व अदंर नर व ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये अदंत मादी व अदंर नर व दोन दात नर व दोन दात मादी या गटात मारवारी जातीच्या घोड्यांची अश्व सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. त्यात ‘सौरभ’ या घोड्याने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत देशातील विविध प्रांतातून उमदे घोडे सहभागी झाले होते.चेतक फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल व समितीकडून येथे दरवर्षी अश्व स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरात, राजस्थान आदी भागातून घोडेमालक आपले जातीवंत व उमदे घोडे घेऊन येतात. या घोड्यांसाठी घोडे बाजारापासून एक किलोमीटर अंतरावरील गोवर्धन प्रांगणात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या घोड्यांची किंमत १० ते १५ लाखापर्यंत असते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणाºया घोड्यांबरोबरच स्पर्धा पाहण्यासाठी देशभरातून अश्वशौकीन येथे दाखल होतात.पहिल्या गटात झालेल्या अदंत नर गटात ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यात राजस्थानमधील श्रवणकुमार यांच्या ‘सौरभ’ घोड्याने प्रथम, अहमदनगर येथील राज सातपुते यांचा ‘फर्जन’ द्वितीय तर तृतीय क्रमांक उत्तर प्रदेशातील रफीक अहमद यांच्या ‘करण’ या घोड्याने पटकावला. अदंत मादी गटात ४० स्पर्धक सहभागी झाले. त्यात अहमदाबाद येथील दिनेशभाई ठाकूर यांच्या ‘राजश्री’ घोडीने प्रथम, गुजरातमधील जबरसिंग यांच्या ‘खुशबू’ने द्वितीय तर हरियाणा येथील आशिष नंदाल यांच्या ‘शान’ घोडीने तृतीय क्रमांक पटकावला.दोन दात नर गटात ४० स्पर्धक सहभागी झाले. त्यात प्रथम क्रमांक गुजरातमधील राजूभाई देसाई यांच्या ‘रॉक’ घोड्याने, द्वितीय जामनगर येथील चरणजितसिंह महडू यांचा ‘केसरिया’ तर तृतीय क्रमांक अहमदनगर येथील इमरान शेख यांच्या ‘बुलंद’ घोड्याने पटकावला. दोन दात मादी गटात ३० स्पर्धक सहभागी झाले. त्यात गुजरातमधील पहाडसिंग यांच्या ‘धरती’ घोडी प्रथम, सुरत येथील नागेश देसाई यांची ‘अश्वशक्ती’ द्वितीय तर सुरत येथीलच नरेंद्रकुमार यांच्या ‘देवसेना’ घोडीने तृतीय क्रमांक पटकावला.परीक्षक म्हणून सुखविंदरसिंग सिंधू, मयूरसिंग जडेजा, नरेशभाई खच्चर, डॉ.विज खाहीद, जयेश पेकळे, बालराजसिंग नागरा यांनी काम पाहिले. चेतक फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, प्रणवराज रावल, रणवीर रावल, पवनसिंह चावडा, अजित नंदाल या मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या घोडे मालकांना प्रथम ५१ हजार, द्वितीय ३१ हजार तर तृतीय २१ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी महेंद्र गिरासे, विवेक वाडिले, एकनाथ गिरासे, विशाल आगळे, विनोद तावडे, अजय पाटील, संदीप जमादार, विलास चौधरी आदींनी परिश्रम घेतले.