सातपुडा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:12 PM2019-12-12T12:12:04+5:302019-12-12T12:12:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा साखर कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू आहे. दैनंदिन साडेतीन ते चार हजार मे.टन ऊस ...

Satpuda Sugar factory started at full capacity | सातपुडा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू

सातपुडा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सातपुडा साखर कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू आहे. दैनंदिन साडेतीन ते चार हजार मे.टन ऊस गाळप होत आहे. आतापर्यंत ५३,८१० मे.टन ऊस गाळप झाला आहे. जाहीर केलेल्या २३१५ रुपये भावाप्रमाणे ३० नोव्हेंबरपर्यंत गाळप झालेल्या उसाचे पेमेंट या आठवड्यात अदा केले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी दिली.
याबाबत माहिती देतांना चेअरमन दीपक पाटील यांनी सांगितले, यावर्षी सातपुडा कारखान्याचा ऊस तोडणी कार्यक्रमातील सुसूत्रता, ऊरा वजन याबाबतीत पारदर्शक धोरण असल्या कारणाने तसेच शेतक-यांचा बांधापर्यंत पोहचून ऊस लागवड, जोपासना याबाबतीत तज्ञांकडून मार्गदर्शन नियमित सुरु ठेवलेले आहे. उधारीने सेंद्रीय खतही उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच ऊस जोपासनेकरीता लागणारे सल्फर वाजवी दरात शेतकन्यांना उपलब्ध करून देत आहे. अशाप्रकारे दर एकरी ऊस उत्पादकतेत वाढ होऊन शेतक-यांचा फायदा व्हावा याकरिता ऊस विकास धोरण कार्यक्षेत्रातील फक्त सातपुडा कारखान्यानेच अवलंबलेले आहे. याचाच परिणाम म्हणून यावर्षी सातपुडा सहकारी साखर कारखान्याकड़े ऊस पुरवठा करण्याचा कल वाढलेला आहे. याचीच भीती कार्यक्षेत्रातील खाजगी कारखान्याला भासवत असल्या कारणाने गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर मध्येच ऊस दर ३० रुपये प्रती टनप्रमाणे वाढवून ऊस उत्पादकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे व सहकार तत्व आपल्या भागातून मोडीत काढून भविष्यात मनमानी कारभार करण्याचा प्रयत्नाचाच हा भाग आहे.
कार्यक्षेत्रात फक्त सातपुडा कारखाना शेतकऱ्यांच्या शिवारावर जाऊन ऊस लागवडपासून ते ऊस तोड होईपावेतो मार्गदर्शन करतो. ऊस तोड मजूर, वाहन चालक किंवा कारखान्याचा स्टाफ शेतकरी बांधवांकडून कुठलीही आर्थिक मागणी करीत नसतात. शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या ऊसाचे वजन मोबाईल एस.एम.एस. द्वारे वजन काटयावरूनच शेतकºयांना दिले जाते. दोन वर्षे अगोदर कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध होता, कार्यक्षेत्रातील खाजगी कारखाने उभ्या ऊसाचा विचार न करता कारखाना बंद केले. मात्र सातपुडा हा एकमेव कारखाना असा होता की, शेतकºयांचा नोंद व बिगर नोंद उभा ऊस पूर्णपणे तुटेपर्यत तोटा सहन करून कारखाना सुरु ठेवला व करोडो रूपयांचे शेतकºयांचे नुकसान वाचविले. याउलट इतर कारखान्यांची काय स्थिती आहे हे समजून सांगण्याची गरजच नाही. त्याचा अनुभव प्रत्यक्षात येत आहे. आपण आपल्या कारखान्यामार्फत अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहोत. एवढी सुविधा न देता केवळ दर वाढवून शेतकºयांची दिशाभूल करून सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे. आमीषाला बळी पडू नका व सातपुडा कारखाना जाहीर केलेल्या ऊस दराप्रमाणेच वेळेतच सर्व बिले अदा करणार आहे. तरी कारखान्याकडे नोंद केलेला ऊस कारखान्यासच द्यावा असे आवाहन चेअरमन दीपकभाई पाटील यांनी केले आहे.

Web Title: Satpuda Sugar factory started at full capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.