शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
2
वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप
3
Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर
4
Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?
5
मालकासाठी आयुष्य झिजवलं, पण त्याने मुलाच्या लग्नाला बोलावलं नाही; ६० वर्षीय वृद्धाची पोलीस ठाण्यात धाव
6
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
7
"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
8
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
9
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
10
Bhogi Festival 2026: खेंगट, बाजरीची भाकरी आणि लोणी; संक्रांतीच्या आधी भोगी का महत्त्वाची?
11
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
12
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
13
ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या
14
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
15
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
16
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
17
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
18
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
19
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
20
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
Daily Top 2Weekly Top 5

देवीच्या मुखदर्शनावर मानावे लागले समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर धार्मिक स्थळे बंद असल्याने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांना दर्शनाविना परत फिरावे लागल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर धार्मिक स्थळे बंद असल्याने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांना दर्शनाविना परत फिरावे लागल्याचे चित्र शहरातील देवी मंदिरांवर दिसून आले. काहींनी दूरूनच मुख दर्शन घेऊन समाधान मानले. दरम्यान, शहरातील सर्वच मंदिरांवर वाढीव पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.     नवरात्रोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. यंदा कुठलाही उत्साह नवरात्रोत्सोवात दिसून येत नसल्याची स्थिती आहे. मंदिर परिसरांमध्ये सामसूम आहे. अशा ठिकाणी पुजारी आणि बंदोबस्तावरील पोलिसांचे अस्तीत्व दिसून येत आहे. यात्रा परिसरात सन्नाटानवरात्रोत्सात खोडाई माता यात्रोत्सवानिमित्त यशवंत विद्यालयाचे पटांगण व मंदिर परिसरात गजबजलेले असते. विविध व्यावसायिकांची आणि भाविकांची रेलचेल असते. परंतु यंदा यात्रोत्सवच नसल्यामुळे या भागात सामसूम आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरीकेटींग लावले   आहे. मंदीर परिसरात तेथील पुजारी आणि सेवेकरी यांच्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. टेलिफोन कार्यालय आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रस्त्यांवर बॅरीकेटींग लावली आहे. या ठिकाणी पोलीसाची राहुटी लावण्यात आली आहे. बंदोबस्त येथे तैणात राहणार आहे. पहाटे महिला भाविक दाखलनवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असल्याने शहरातील विविध भागातून महिला पायीच दर्शनासाठी पहाटे पाच वाजेपासून दाखल होत होत्या. परंतु बॅरीकेटींग पाहून त्यांना दुरूनच कळस दर्शन घ्यावे लागत होते. मंदिरे बंद असल्याने दर्शनासाठी कुणीही येऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.  खोडाईमाता मंदिरासह वाघेश्वरी मंदीर, संकष्टादेवी, लक्ष्मीदेवी मंदीर या  मंदिरांवर देखील अशीच स्थिती दिसून आली. 

लहान व्यावसायिकांना बसला आर्थिक फटका...यात्रोत्सवासह मंदिरे बंद असल्यामुळे विविध व्यावसायिकांना त्याचा फटका बसला आहे. फुलं, पुजेचा सामान, प्रसाद विक्रेते यांच्यासह इतर वस्तू विक्रेत्यांचा त्यात समावेश आहे.जिल्ह्यातील सर्वच मंदिर परिसरात वाढीव पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आलेला आहे. भाविकांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. सार्वजिनक गरबा मंडळांकडून देखील यंदा कुठलाही सार्वजिनक कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा मंडळाचे परिसर आणि चौकात सामसूम असल्याचे चित्र आहे.