शहादा तालुक्यात आजपासून सरपंच निवड कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST2021-02-12T04:29:40+5:302021-02-12T04:29:40+5:30

तालुक्यात शुक्रवारी कुकावल (सर्वसाधारण), कुऱ्हावदतर्फे सारंगखेडा(अनुसूचित जमाती), दोंदवाडा (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव), तोरखेडा (सर्वसाधारण स्त्री) टेभेतर्फे शहादा, ...

Sarpanch selection program in Shahada taluka from today | शहादा तालुक्यात आजपासून सरपंच निवड कार्यक्रम

शहादा तालुक्यात आजपासून सरपंच निवड कार्यक्रम

तालुक्यात शुक्रवारी कुकावल (सर्वसाधारण), कुऱ्हावदतर्फे सारंगखेडा(अनुसूचित जमाती), दोंदवाडा (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव), तोरखेडा (सर्वसाधारण स्त्री) टेभेतर्फे शहादा, (अनुसूचित जमाती स्‍त्री), शेल्टी (सर्वसाधारण), टेंभेतर्फे सारंगखेडा (सर्वसाधारण स्त्री), बामखेडातर्फे सारंगखेडा (नागरिकांचा मागास प्रवर्ग), बामखेडा (सर्वसाधारण), सोनवद (नागरिकांचा मागास प्रवर्ग), कानडी (सर्वसाधारण स्त्री), सारंगखेडा (सर्वसाधारण), डामरखेडा (नागरिकांचा मागास प्रवर्ग), मोहिदातर्फे शहादा (सर्वसाधारण स्त्री), राणीपूर (अनुसूचित जमाती), नागझिरी (अनुसूचित जमाती स्‍त्री)या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवड प्रक्रिया होणार आहे.

१४ फेब्रुवारी दुसऱ्या टप्प्यातील ११ ग्रामपंचायतीत सरपंच निवड होणार आहे. यात कोठलीतर्फे सारंगखेडा (सर्वसाधारण स्त्री), कौठळ तसा (नागरिकांचा मागास प्रवर्ग), नांदरखेडा (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), दोंदवाडा (सर्व साधारण स्त्री), फेस (सर्वसाधारण), पुसनद (अनुसूचित जाती), मनरद (सर्वसाधारण स्त्री), हिंगणी (सर्वसाधारण स्त्री), कोट बांधणी( अनुसूचित जमाती) असलोद (अनुसूचित जमाती स्‍त्री), न्यू असलोद(अनुसूचित जमाती) या गावांचा समावेश आहे.

सरपंच निवडणूक तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. बी.एस.जडे, एच.बी.भोई, सी.एच.निकम, जुबेर. एम पठाण, आर.एम.साटोटे, बी.एफ.निकम, केदारेश्वर गिरासे, मुकेश चव्हाण, निशिगंधा साळवे, के. एम.सय्यद, सी.एस.निकुंभ, जी.आर.पाटील, पी.बी.अमृतकर, बी.एस.सूर्यवंशी, सुनील गावित, एस.झेड.देवरे, बी.ओ.पाटील, बी.बी.सूर्यवंशी, डी.बी.बेलदार व एम.आर.देव यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

Web Title: Sarpanch selection program in Shahada taluka from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.