शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
3
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
4
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
5
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
6
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
7
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
8
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
9
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
10
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
11
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
12
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
13
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
14
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
15
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
16
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
17
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
18
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
19
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   

गुजरात निवडणुकीत सरदार सरोवराचीच होतेय चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 11:27 AM

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर गुजरातच्या हद्दीत साकारलेला सरदार सरोवर प्रकल्प गेल्या चार दशकांपासून विविध मुद्यांवरून चर्चेत आहे.  या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील ३३ गावे व लाखो झाडे बुडितात गेली. अनेक कुटुंबांचा सिंचन तसेच जमिनीसाठी संघर्ष सुरूच आहे.  

रमाकांत पाटील -नंदुरबार : पुनर्वसन, पर्यावरण आणि लाभहानीच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजणारा सरदार सरोवर प्रकल्पाचा मुद्दा सध्या गुजरात निवडणुकीत पहिल्या टप्प्यात सर्वच पक्षांनी प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. भाजप त्याचे श्रेय घेऊन त्यातून गुजरातचा विकास केल्याचा दावा करीत आहे, तर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने मात्र या प्रकल्पाच्या विकासाचा दावा फोल ठरल्याचा आरोप केला आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर गुजरातच्या हद्दीत साकारलेला सरदार सरोवर प्रकल्प गेल्या चार दशकांपासून विविध मुद्यांवरून चर्चेत आहे.  या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील ३३ गावे व लाखो झाडे बुडितात गेली. अनेक कुटुंबांचा सिंचन तसेच जमिनीसाठी संघर्ष सुरूच आहे.  

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सरदार सराेवराचा मुद्दा चर्चेत येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मे बनायू गुजरात...’ हा गुजराती लोकांना निवडणुकीचा संदेश दिला. त्यावर आधारित एक व्हिडीओही भाजपने जारी केला आहे. नर्मदा बचाववाले आमच्या जिवाचे दुश्मन झाले होते. तरीही. नर्मदेचे पाणी थेट कच्छला पोहोचेपर्यंत लढलो आणि जिंकलोही. हे मुद्दे आणि या विकासाची यशोगाथा व्हिडीओ दाखवून प्रकल्प प्रचाराचा मुद्दा बनवला आहे.

१ रुपयाच्या नाण्यांची भरली अनामत रक्कमगुजरातमधील गांधीनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महेंद्र पटणी हे निवडणूक लढवत आहेत. ते रोजंदारीचे काम करतात. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी १ रुपयांची दहा हजार नाणी अनामत रक्कम म्हणून भरली. मित्रमंडळींनी इतकी नाणी गोळा करून पटणी यांच्याकडे सुपूर्द केली होती. गांधीनगर येथील महात्मा मंदिर भागातल्या ५२१ झोपड्या नुकत्याच हटविण्यात आल्या. त्या रहिवाशांचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलो आहे, असे पटणी यांनी सांगितले. 

दुसऱ्या टप्प्यातील १,११२ अर्ज ठरले वैध -गुजरात विधानसभा निवडणुकांचा दुसरा टप्पा ५ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ९३ विधानसभा जागांकरिता होणाऱ्या निवडणुकांकरिता दाखल झालेल्या १५१५ अर्जांपैकी उमेदवारी अर्जांपैकी १,११२ अर्ज वैध ठरले आहेत. या राज्यातील विधानसभा निवडणुकांचा पहिला टप्पा १ डिसेंबर रोजी पार पडणार असून त्यावेळी ८९ जागांसाठी लढत होईल. गुजरात विधानसभा निवडणुकांत एकूण १८२ जागांसाठी लढत होणार आहे. त्यांची मतमोजणी ८ डिसेंबरला होऊन निकाल जाहीर करण्यात येतील. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022GujaratगुजरातElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा