अक्कलकुवा तालुक्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:39 PM2020-08-14T12:39:27+5:302020-08-14T12:39:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे़ यामुळे सातपुड्यात उगम पावणारे नदी नाले ...

Santatdhar in Akkalkuwa taluka | अक्कलकुवा तालुक्यात संततधार

अक्कलकुवा तालुक्यात संततधार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे़ यामुळे सातपुड्यात उगम पावणारे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत़ तब्बल दीड महिना दडी मारणाऱ्या पावसाने संततधार हजेरी लावली लावल्याने सातपुड्यातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे़
अक्कलकुवा परिसरासह तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़ दरम्यान संततधार पावसामुळे गारठा निर्माण झाला असून सातपुड्यात दाट धुके पसरत आहे़ धबधबे ओसंडून वाहू लागले असल्याने पर्यटकही आकर्षित होवून मोलगी व डाब परिसराकडे वळत आहेत़ काही निसर्गप्रेमी पर्यटक भर पावसामध्ये सातपुड्याची सैर करत असल्याचे दिसून येत आहे़ दरम्यान पावसाचा जोर वाढत असल्याने नर्मदा काठावरच्या गावांचा संपर्क तुटण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे़
मुसळधार पावसामुळे नर्मदा काठावरील गावांना तसेच सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाºया अनेक गावांना जोडणारा पिंपळखुटा ते जांगठी रस्ता बंद पडण्याची भिती आहे़ रस्त्यावर एकेठिकाणी मोठे भगदाड पडले असल्याने तो वाहून जाण्याची शक्यता आहे़ याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास संपर्क तुटण्याची शक्यता आहे़
दरम्यान तालुक्यातील मोलगी ते अक्कलकुवा रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्याने यंदा वाहतूक बंद पडण्याचा धोका कमी झाला आहे़ गेल्या वर्षी झालेल्या अतीवृष्टीत हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला होता़ काही दिवसांपूर्वी बांधकाम विभागाने रस्ता काम नव्याने सुरू केले होते़ यातून ढापे आणि फरशी पूल सुस्थितीत असल्याची माहिती आहे़

Web Title: Santatdhar in Akkalkuwa taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.