लोकमत न्यूज नेटवर्कशनिमांडळ : नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ व लगतच्या परिसरात यंदा अल्प क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आह़े मागील वर्षी कांद्याला मिळालेल्या अल्पदरामुळे यंदा ही घट करण्यात आली आह़े गेल्या वर्षी शेकडो क्विंटल कांदा पिकवूनही पुरेसा भाव मिळाला नसल्याने शेतक:यांमध्ये प्रचंड नाराजी आह़े भांडवली खर्च करुनही एक रुपयाही उत्पन्न मिळाले नसल्याने यंदा जेमतेमच कांद्याची लागवड करण्यात आली आह़े कपाशीवर जास्तीत जास्त भर देण्यात येऊन कांदा पिकासाठी अल्प क्षेत्रच ठेवण्यात आले आह़े गाव व परिसराचा विचार केला तर एकूण क्षेत्राच्या दहा टक्केही कांदा लागवड नाही़ दोन ते तीन एकर कांदा लागवड करणारा शेतकरी बहुतांशी कापूस लागवड करुन मोकळा झाला होता़ मात्र मुगाचे शेत खाली झाल्याने त्यात कांद्याचे पीक घेण्यात आले आह़े 300 ते 400 वाफ्यात सरासरी एका एकरात 80 ते 100 कट्टयार्पयत कांदा निघत आह़े विविध रोगराई व पाण्याच्या अभावामुळे उत्पादनात मोठी घट आल्याचे चित्र समोर आले आह़े मात्र याही स्थितीत एकरी 200 कट्टयार्पयत सरासरी 100 क्विंटलर्पयत येणारा कांदा 40 ते 50 क्विंटलर्पयत निघत आह़े 1600 ते 2200 रुपये प्रती क्विंटल इंदोर, अहमदाबाद येथील मोठय़ा मार्केटमध्ये विकला जात आह़े उत्पादन घटले असले तरी भाव समाधानकारक मिळत असल्यो शेतकरी वर्गामध्ये काहीसे समाधान दिसून येत आह़े
शनिमांडळ परिसरात कांदा लागवडीबाबत उदासिनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 11:59 IST
भाव नसल्याने नाराजी : एकूण क्षेत्रापैकी 10 टक्केही कांदा लागवड नाही
शनिमांडळ परिसरात कांदा लागवडीबाबत उदासिनता
ठळक मुद्देउन्हाळी कांदा घटण्याचे चिन्ह नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होत असणारी कांदा लागवड मोठय़ा प्रमाणावर घटणार असल्याचे चित्र सध्या दिसत आह़े भर पावसाळ्यात नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात विहिरींना पाणी नसल्याने रब्बीतील गहु, हरभरा हि पिके निघणेही मुश्किल झाले आह़े ते