शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कृषिपंपधारकांकडे २९५ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 20:06 IST

शहादा विभाग : २७ हजार कृषिपंपधारक, वर्षागणिक वाढतेय थकबाकीची रक्कम

बोरद : शहादा उपविभागांतर्गत येणाऱ्या तळोदा, शहादा, अक्कलकुवा व धडगाव या चार तालुक्यांमध्ये कृषिधारकांकडे तब्बल २९५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती उघड झाली आहे़ गेल्या अनेक वर्षांच्या या थकबाकीत केवळ वाढच होत असल्याने या थकबाकीचे करायचे काय? असा प्रश्न महावितरण व शेतकऱ्यांना भेडसावत आहे़जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने कृषिपंपधारकांकडून कृषिपंपाच्या बिलाची वसुली करण्यासाठी शासनाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे़ तुर्तास या थकबाकीला थांबवले असले तरी, कृषिपंपाचे थकीत बिल माफ करण्याबाबत शासनाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये़ त्यामुळे साहजिकच डोक्यावर ऐवढीमोठी थकबाकी असल्याने कृषिपंपधारकांकडून चिंता व्यक्त होत आहे़ सध्या थकबाकी वसुली होत नसली तरी पुढील पावसाळा चांगला झाल्यास तसेच निवडणुका आटोपल्यास थकबाकीचे भुत पुन्हा कृषिपंपधारकांच्या मानगुटीवर बसणार की काय? असा प्रश्न या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे़ त्यामुळे शासनाने थकबाकी माफ करावी अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे़दरम्यान, शहादा तालुक्यात २२० कोटी, तळोदा तालुक्यात ४९ कोटी, अक्कलकुवा तालुक्यात २२ कोटी तर धडगाव तालुक्यात ४ कोटी असे चारही तालुके मिळून २६ हजार ७५० कृषिपंपधारकांकडे २९५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती महावितरणच्या शहादा उपविभागाकडून देण्यात आलेली आहे़दरम्यान, यंदा जिल्ह्यात केवळ ६७ टक्के इतक्या पावसाची नोंद झालेली होती़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती ओढावली आहे़ पावसाचे पाणी जमिनीत मुरलेच नसल्याने साहजिकच दिवसेंदिवस भूजल पातळी खालावत आह़े़ जिल्ह्यातील विविध जलस्त्रोत आटून गेले आहेत़ लघुप्रकल्प, विहिरी, गाव तलाव आदींमध्ये नावालासुध्दा पाणी राहिलेले नाही़ शेतकºयांच्या कुपनलिकाही पूर्णपणे आटल्या आहेत़ जिल्ह्यात भयंकर दुष्काळी स्थिती असल्याने साहजिकच अनेक शेतकºयांचे कृषिपंपही अनेक महिन्यांपासून बंद असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे़सौर उर्जेवरील कृषिपंप सुरु करावेअनेक जिल्ह्यांमध्ये सौर उर्जेवर कृषिपंप सुरु करण्यात आलेले आहे़ यामुळे वीजदेखील वाचत असून शेतकºयांवर वीजबिलाचा बोजाही कमी होत असतो़ त्यामुळे स्थानिक ठिकाणीही सौर उर्जेवर चालणारे कृषिपंप बसविण्यात यावे अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे़ यासाठी शहादा उपविभागातील चारही तालुक्यातील एकूण १ हजार ७०० कृषिपंपधारकांनी अर्ज केले असल्याची माहिती मिळाली़ सौरउर्जेवर चालणाºया कृषिपंपाना हरकत नाही परंतु विघ्नसंतोषी लोकांकडून सौर पंपाच्या प्लेटा फोडणे, साहित्यांची चोरी करणे आदी घटना होण्याची भिती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे़दरम्यान, ‘एक डिपी एक पोल’ याअंतर्गत आलेल्या अर्जांपैकी सुमारे १ हजार १०० शेतकºयांचे अर्ज मंजुर करण्यात आले असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आलेली आहे़ याबाबत लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे़