प्रकाशात देवदर्शनासाठी भाविकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:45 PM2020-02-22T12:45:38+5:302020-02-22T12:45:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : तिर्थक्षेत्र दक्षिण काशी (प्रकाशा) येथील प्रमुख केदारेश्वर महादेव मंदिर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर या सर्वच मंदिरांवर ...

Rows of devotees for darshan in the light | प्रकाशात देवदर्शनासाठी भाविकांच्या रांगा

प्रकाशात देवदर्शनासाठी भाविकांच्या रांगा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : तिर्थक्षेत्र दक्षिण काशी (प्रकाशा) येथील प्रमुख केदारेश्वर महादेव मंदिर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर या सर्वच मंदिरांवर शिवभक्तांनी बम बम भोलेचा जय जयकार करत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तेथे भंडारा, लघुरुद्र, रामनाम जपसह अन्य धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. विविध व्यावसायिक दाखल झाल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
प्रकाशा येथील प्रमुख केदारेश्वर, काशीविश्वेश्वर महादेव मंदिरावर भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या. अशीच गर्दी पुष्पदंतेश्वर मंदिरांवरही दिसून आली. भाविकांनी सूर्यकन्या तापी नदीत पवित्र स्नान करून मंदिराचे दर्शन घेतले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, काशीविश्वेश्वर मंदिराचे अध्यक्ष दिलीप चौधरी, पुष्पदंतेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हितेश वाणी यांच्यासह सर्व संचालक मंडळ मंदिर परिसरात उपस्थित होते. संगमेश्वर महादेव मंदिरावर देखील ट्रस्टचे अध्यक्ष मोहन चौधरी यांनी भाविकांच्या सुविधेसाठी व्यवस्था केली.
नद्यांच्या संगमस्थळावरही भाविकांची गर्दी दिसून आली. तुंबा चौधरी यांच्या परिवाराने महाभंडारा आयोजित केला, त्याचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला. गौतमेश्वर महादेव मंदिर येथे सिंहस्थ पर्वणीतील ध्वजाचे मानकरी असलेल्या गढी परिवाराने महादेवाचे दर्शन घेत भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन केले. ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरासह चिंतामणी महादेव, मुक्तेश्वर महादेव मंदिर आदी ठिंकाणी भावीकांची गर्दी दिसून आली. १३ वर्षाच्या अखंड परंपरेनुसार शहादा येथील जय भोले ग्रुपतर्फे भंडारा देण्यात आला. यासाठी जय भोलग्रुपने मोठा खर्च पेलवला. प्रकाशा येथील धार्मिक कार्यक्रमांमधील रामनाम जपचा तिसरा दिवस असून यासाठी पंचक्रोशीतील सुमारे हजारो उपस्थिती नोंदवली. साध्वी कमलाबेन व प.पू.संत श्री संतोष महाराज हे देखील व्यासपीठावर होते.

Web Title: Rows of devotees for darshan in the light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.