निवेदनात म्हटले आहे की, शहादा-मंदाणे ते शहाणा-बोराडी-सांगवी-हातेड या राज्य मार्गाच्या काम सध्या सुरू आहे. या मार्गावर असलेल्या गाव अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. मंदाणे हे परिसरातील ४० खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे लोकांची वर्दळ असते. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. रात्रीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता असून दोन दिवसांपूर्वी असलोद-मंदाणे रस्त्यावरील काम सुरू असलेल्या ठिकाणी दोन जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. रस्ता बनविण्याचे काम ज्या कंपनीने घेतले असेल त्या कंपनीने लवकरात लवकर काम पूर्ण करावे व प्रशासनानेदेखील याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी व पुढील दुर्घटना टाळण्यासाठी रस्त्याचे काँक्रिटीकरण जलदगतीने पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष प्रकाश पवार, विजय कोठारी, नारायण पवार, पंडित पवार, दिनेश चव्हाण, राजेंद्र मोरे, काशीनाथ भामरे, किशोर वाघ, राजेंद्र भामरे, मुकेश पाटोळे, आंजन पावरा, रहीम खाटीक, रवींद्र राठोड, सर्जन पवार, शिवाजी चव्हाण, रवींद्र पाटील, सुरेश मराठे, मोहनदास पवार, अल्ताफ तेली, संतोष पवार, दगडू मोरे, दिलीप पाटील, दीपक पाटील आदींच्या सह्या आहेत.
रस्ता काँक्रिटीकरण जलद गतीने करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST