शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

नंदुरबारातील मजूर स्थलांतरामुळे परीक्षांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 4:08 PM

नंदुरबार :  प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. काही शाळांनी सुरुवातीलाच तोंडी परीक्षा घेण्यास सुरुवात ...

नंदुरबार :  प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. काही शाळांनी सुरुवातीलाच तोंडी परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे तर काही शाळा लेखी परीक्षेनंतर तोंडी परीक्षा घेणार आहेत. असे असले तर मजूर स्थलांतर करीत असतांना आपल्या पाल्यांना देखील घेवून जात असल्यामुळे अनेक शाळा ओस पडत आहे. परिणामी सत्र परिक्षांवर देखील परिणाम होत आहे. दरम्यान, पायाभूत चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आता विद्या प्राधिकरणाकडून न येता स्थानिक ठिकाणीच शिक्षक काढणार आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचा घोळ थांबणार आहे.दुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर यंदा प्रथम सत्राच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. सोमवारपासून काही शाळांमध्ये तोंडी परीक्षेला सुरुवात झाली आहे. लेखी परीक्षांना येत्या दोन दिवसात सुरूवात होणार आहे. 3 नोव्हेंबर्पयत प्रथम सत्राच्या लेखी व तोंडी परीक्षा झाल्यानंतर दिवाळीच्या सुटय़ा राहणार आहेत. साधारणत: 17 ते 21 दिवस या सुटय़ा राहणार आहेत. 20 नोव्हेंबरपासून दुस:या सत्राला सुरुवात होणार आहे. दुष्काळी पाश्र्वभुमीजिल्ह्यात दुष्काळी पाश्र्वभुमीवर यंदा शाळांच्या परीक्षा होत आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. खरीप पीक हाताचे गेल्याने ग्रामिण भागात हलाखीची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा वेळी या परीक्षा होत आहेत.मजुरांचे स्थलांतरजिल्ह्यातील अनेक गावांमधील मजुर रोजगारासाठी इतर जिल्ह्यात स्थलांतर करीत आहेत. गावोगावी ट्रका भरून मजूर परराज्या रवाना होत आहेत. मजुर आपल्यासोबत आपल्या पाल्यांना देखील घेवून जात असल्यामुळे त्यांच्या शाळेचा आणि परीक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. मुलांना परीक्षेनंतर घेवून जाण्याची विनंती काही ठिकाणी शिक्षक करीत    आहेत. पायाभूत चाचणीसाठी सर्वच विद्यार्थी उपस्थित राहणे आवश्यक असते. त्यामुळे शिक्षकांची घालमेल सुरू आहे. दुसरीकडे स्थलांतरीत होणारे मजूर व पालक आपल्या पाल्याला अर्थात विद्याथ्र्याला कुणाच्या भरोशावर गावी सोडून जावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकत  आहे. यामुळे विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यावर प्राथमिक शिक्षण विभागातर्फे पर्याय निर्माण करणे आवश्यक आहे.