तळोदा : नर्मदा गा:हाणे प्राधिकरणाचे अध्यक्ष ए.एस. बग्गा यांनी सरदार सरोवर प्रकल्पातील चार पुनर्वसन वसाहतींना गुरुवारी भेट दिली. या वेळी बाधितांनी त्यांच्यापुढे सिंचनाची रक्कम, घरप्लॉट, मूळ गावातील बाधीतांचे पुनर्वसन, गहाळ झालेल्या फेरफार नोंदी अशा वेगवेगळ्या समस्या कथन केल्या. यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. या समस्यांवर संबंधित अधिका:यांनी तातडीने कार्यवाही करण्याची सूचना बग्गा यांनी दिली.सरदार सरोवर प्रकल्पातील बाधितांच्या न्यायासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील गा:हाणे निराकरण प्राधीकरण समितीचे अध्यक्ष ए.एस. बग्गा यांनी नर्मदानगर, रेवानगर, सरदारनगर व देवमोगरा पुनर्वसन या चार वसाहतींना भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी जयसिंग वळवी, सरदार सरोवर प्रकल्पाच्या सहायक जिल्हाधिकारी सीमा अहिरे, जि.प. बांधकाम विभागाचे एस.डी. पाटील, तहसीलदार योगेश चंद्रे, गा:हाणे निराकरणाचे भानुदास ब:हाटे, तहसीलदार बनसोडे आदी उपस्थित होते. बग्गा यांनी पुनर्वसन वसाहतींना भेट दिली असता विस्थापितांनी अनेक समस्या मांडल्या. मूळ गावात अजूनही 80 पेक्षा अधिक बाधीत आहेत. त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे. त्याचबरोबर सामूहिक सिंचनासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. परंतु प्रत्यक्षात अजून बाधीतांना त्यांचे पैसे मिळाले नाही. यासाठी बाधितांकडून सतत मागणी होत आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली. याशिवाय नर्मदानगर येथील बाधीतांनी गावाचे फेरफार नोंदीचे दप्तर गहाळ झाले आहे. अजूनही त्याबाबत कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तातडीने दप्तर दुरुस्ती करून मिळावी. तसेच अजूनही 90 जणांना प्लॉट मिळालेले नाहीत. त्यांना तातडीने घर प्लॉट मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. रेवानगर येथील विस्थापीतांनी पुनर्वसनबाबतचे 23 कॉलमची पूर्तता करण्यात येऊन ज्या बाधीतांची टापू जमीन आहे त्यांनाही त्याचा मोबदल्यात जमीन मिळावी, अशी मागणी केली. बग्या यांनी रेवानगर जिल्हा परिषद शाळेतदेखील भेट देऊन पाहणी केली. वसाहतीतील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करावे, अशीही मागणी बाधीतांनी केली.बाधीतांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर बग्गा यांनी सर्व संबंधित अधिका:यांना तातडीने त्यावर अंमलबजावणी करण्याची सूचना दिली. या वेळी पुनर्वसन समितीचे सदस्य दाज्या पावरा, चेतन साळवे, पुण्या वसावे, दिलीप तडवी, सीताराम पाडवी, नाथा पावरा, मान्या पावरा, सबलाल पावरा, दिलीप पाडवी, किर्ती वसावे, निमजी वसावे, जेठय़ा पावरा, लोटय़ा पावरा, बारक्या पावरा, सेलसिंग पावरा आदींसह बाधीत उपस्थित होते.
पुनर्वसीतांच्या समस्या तातडीने सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:18 IST