शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

सुलवाडे, बामखेडा, कळंबूत रुग्ण आढळल्याने उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी/बामखेडा/कळंबू : शहादा तालुक्यातील सुलवाडे, बामखेडा त.त. व कळंबू येथे कोरोना बाधित प्रत्येकी एक रुग्ण आढळून ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी/बामखेडा/कळंबू : शहादा तालुक्यातील सुलवाडे, बामखेडा त.त. व कळंबू येथे कोरोना बाधित प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याने या गावांमध्ये ग्रामपंचायत व आरोग्य विभागातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत.सुलवाडे येथे फवारणीशहादा तालुक्यातील सुलवाडे येथील ७० वर्षीय वृद्ध महिला धुळे येथे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने सुलवाडे गावात आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू असून संपर्कात आलेल्या चार जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. धुळे येथील एका खाजगी दवाखान्यात महिलेला उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल रविवारी सकाळी स्थानिक आरोग्य विभागाला प्राप्त झाला. आरोग्य विभागाचे कम्युनिटी हेल्थ आॅफिसर डॉ.प्रसाद पाटील, औषध निर्माण अधिकारी मधुकर पाटील, आरोग्यसेवक कुवर, सोनिया महेंद्रे व आरोग्य पथकामार्फत उपाययोजना करण्यात येत असून कोरोना पॉझिटीव्ह महिलेच्या कुटुंबातील चार जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ग्रामपंचायतीतर्फे गावात फवारणी करण्यात आली असून बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे. सरपंच कैलास पवार, उपसरपंच अशोक वाघ, ग्रामसेवक बी.आर. माळी, दिलीप पवार, पोलीस पाटील सचिन पवार आदी गावात लक्ष ठेवून आहेत.बामखेड्यात पुन्हा रुग्णबामखेडा येथील ७७ वर्षीय वृद्धाला नाशिक येथे खाजगी रुग्णालयात मूत्राशयाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे दाखल होण्याअगोदर कोरोनाची तपासणी केली असता त्यात ते पॉझिटीव्ह आढळून आल्याने गावात खबरदारी घेतली जात आहे. वडाळी येथे एक रुग्ण आढळून आल्याने बामखेडा गाव आधीच बफर झोनमध्ये होते. या रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांना स्वॅब तपासणीसाठी शहादा येथील केंद्रात पाठविण्यात येणार असून सध्या त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून गावात सर्वे करण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस पाटील डॉ.योगेश चौधरी, वडाळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजन दुग्गड व आरोग्य कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.कळंबूत ११ जण क्वारंटाईनशहादा तालुक्यातील कळंबू येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रादुर्भाव वाढूनये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासने उपाययोजना हाती घेत बाधित रुग्णांचे घर व परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. कळंबू येथील एका ७१ वर्षीय पुरुषाचा अहवाल रविवारी पॉझिटीव्ह आल्याने गावात खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोरोना रुग्णाच्या संपर्कातील ११ जणांना स्वॅब तपासणीसाठी शहादा येथील विलगीकरण कक्षात पाठवून क्वारंटाईन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीतर्फे गावात फवारणी करण्यात आली. या वेळी पं.स. सदस्या बानूबाई ईशी, देवेंद्र बोरसे, उपसरपंच वासुदेव बोरसे, ग्रामविकास अधिकारी बी.बी. देसले, सदस्य ललीत बोरसे, सुरेश कुवर, पोलीस पाटील अमरदास पाटील उपस्थित होते. सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, डॉ.राकेश पाटील, जे.बी. गिरासे, वाल्मिक बांगर, मीनाबाई निकम, आशा सेविका दीपाली देवरे, सुनंदा भील, सपना कुवर, अंगणवाडी सेविका सुनंदा पवार, ग्रामपंचायत कर्मचारी देविदास कुवर, मनोहर बोरसे, निंबा कुवर आदी उपाययोजनेसाठी परिश्रम घेत आहेत.