शिल्लक असलेल्या कापसाचा पंचनामा करून भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:38 PM2020-05-24T12:38:31+5:302020-05-24T12:38:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कापूस खरेदी केंद्रात कापूस विक्रीसाठी चार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जवळपास दीड लाख ...

 The remaining cotton should be compensated by Panchnama | शिल्लक असलेल्या कापसाचा पंचनामा करून भरपाई द्यावी

शिल्लक असलेल्या कापसाचा पंचनामा करून भरपाई द्यावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कापूस खरेदी केंद्रात कापूस विक्रीसाठी चार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जवळपास दीड लाख क्विंटलपर्यंत कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडलेला आहे. पावसाळ्यापूर्वी हा कापूस खरेदी झाला नाही तर शेतकºयांना बाजार भाव प्रमाणे मिळालेला भाव आणि खरेदी केंद्राचा भाव यातील फरकाची रक्कम शेतकºयांना मिळावी अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांनी केली आहे.
याबाबत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यात जवळपास ४० टक्के कापूस उत्पादकांचा कापूस अद्याप घरातच पडून आहे. कापूस घरात भरून ठेवला आहे. खरीप हंगामाच्या लागवडीकरीता बळीराजाला मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासणार आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे कापूस विक्री होऊ शकला नाही. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लाागणार आहे. सीसीआयतर्फे कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. नंदुरबारात बाजार समितीअंतर्गत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
जवळपास चार हजार शेतकºयांनी नोंदणी केली आहे. एक लाख ते दीड लाख क्विंटल कापूस विक्रीचा बाकी आहे. शासनाने सर्व शेतकºयांचा सर्व कापूस खरेदी करावा, खरेदी न झाल्यास शेतकºयांनी खुल्या बाजारात कापूस विक्री केल्यास बाजारातील भाव आणि आधारभूूत भाव यातील फरकाची रक्कम शेतकºयांना अदा करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. ज्या शेतकºयांचा कापूस विक्री करणे बाकी असेल अशा शेतकºयांच्या घरोघरी जावून पंचनामा करावा अशी मागणीही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व बाजार समिती सभापती किशोर पाटील यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

Web Title:  The remaining cotton should be compensated by Panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.