शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

रेशनकार्डशी आधार व मोबाईल क्रमांक नोंदवा अन्यथा रेशन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  ३१ जानेवारीपर्यंत रेशनकार्ड आधार संलग्न न झाल्यास फेब्रुवारीपासून रेशनकार्डधारकांना धान्य मिळणार नाही. दरम्यान, जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  ३१ जानेवारीपर्यंत रेशनकार्ड आधार संलग्न न झाल्यास फेब्रुवारीपासून रेशनकार्डधारकांना धान्य मिळणार नाही. दरम्यान, जिल्ह्यात दोन लाख ७६ हजार ७१७  रेशनकार्डधारक असून त्यातील दोन लाख ६४ हजार ७९२ कार्डधारकांचे आधार संलग्न झालेले असून  केवळ ११ हजार ९२५ आधारकार्ड संलग्न करणे बाकी आहे. दरम्यान, दिलेल्या मुदतीत आधार संलग्न रेशनकार्डचे काम पुर्ण झाल्यास त्या त्या तालुक्यातील तहसीलदार, पुरवठा निरिक्षण अधिकारी जबाबदार राहणार आहेत.                      रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक रेशनकार्ड हे आधार संलग्नीत करण्यात येणार आहे. त्याचे काम जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुुलनेत चांगले झाले आहे. आता ३१ जानेवारी ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड यांनी आदेश काढले आहेत. त्यात म्हटले आहे की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार संलग्न १०० टक्के करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजिनक वितरण व्यवस्थेत अधीक पारदर्शकता येण्यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे. रास्तभाव दुकानातील ई-पॅास उपकरणातील ईकेवायसी  व मोबाईल सिडींग सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविण्यात यावे. धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॅास उपकरणाद्वारे दुकानदार  यांच्यामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचा आधार व मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली जाणार आहे.                        सर्व रास्तभाव दुकानदार व पुरवठा निरिक्षक यांना याबाबत प्रशिक्षण देवून सर्व लाभार्थींची आधार  व मोबाईल क्रमांक नोंदवावेत. ३१ जानेवारीपूर्वी आधार व मोबाईल क्रमांक नोंदविले न गेल्यास त्याची जबाबदारी संबधीत तहसीलदार, पुरवठा निरिक्षण अधिकार, पुरवठा निरिक्षक यांची राहील. ज्या कार्डधारकांचे या मुदतीत आधार व मोबाईल नोंदणी न झाल्यास त्या कार्डधारकास पुढील महिन्याचे धान्य दिले जाणार नाही असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. त्यासाठी रेशन दुकानात जाऊन करता येणार आहे. त्यासाठी यापूर्वी व आताही प्रशिक्षण दिले जात आहे. याकरीता पुरवठा निरिक्षण अधिकार व पुरवठा निरिक्षक यांच्यासह रेशन दुकानदारांनाही याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

   कार्डधारक आधार नोंदणीअक्कलकुवा तालुक्यात ४२ हजार ७०६ कार्डधारक असून २,११९ कार्डधारकांची आधार नोंदणी बाकी आहे. धडगाव तालुक्यात २७ हजार ६४५ कार्डधारक व २,२०१ बाकी. नंदुरबार तालुक्यात ५९ हजार ८२६ कार्डधारक असून ९८६ कार्ड बाकी आहेत. नवापूर तालुक्यात ५२ हजार ०६६ कार्डधारक असून ३,१६१ बाकी आहे. शहादा तालुक्यात ६६ हजार ८० कार्डधारक असून २,९४० बाकी आहेत तर तळोदा तालुक्यात २८ हजार ३९८ कार्डधारक असून ५१६ बाकी आहेत.

   कुटूंब सदस्य आधार नोंदणी अक्कलकुवा तालुक्यात  एक लाख ९० हजार ४२२ सदस्यांपैकी ३१ हजार ८७५ बाकी. धडगाव तालुक्यात एक लाख ५१ हजार २२५ पैकी ३० हजार ६२६ बाकी. नंदुरबार तालुक्यात दोन लाख आठ हजार ३६९ पैकी ३७ हजार ३४३ बाकी. नवापूर दोन लाख १४ हजार ९१३ पैकी ४२ हजार ४१ बाकी आहेत. शहादा तालुक्यात तीन लाख १६ हजार ९६९ पैकी ४९ हजार ५१८ बाकी आहेत तर तळोदा तालुक्यात एक लाख ३६ हजार ५१ सदस्यांपैकी २४ हजार ४१४ सदस्यांचे आधार व मोबाईल नंबर जोडणी बाकी आहे. 

रेशनकार्डधारक व कुटूंबसदस्य यांच्या सर्वांचे आधार व मोबाईल नंबर संलग्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही बाकी राहिल्यास संबधितांना धान्य दिले जाणार नाही. यासाठीची प्रक्रिया सोपी असून रेशन दुकानावर जाऊन ती सहज करता येणार आहे.-महेश शेलार, जिल्हा पुरवठा अधिकारी, नंदुरबार.