28 हजार कुटूंबांना हक्काचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:08 PM2019-11-22T12:08:46+5:302019-11-22T12:08:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दोन वर्षात 27 हजार 981 घरकुले पुर्ण करण्यात आली आहेत. 2017 ते 2020 ...

A refuge of rights for 28 thousand families | 28 हजार कुटूंबांना हक्काचा निवारा

28 हजार कुटूंबांना हक्काचा निवारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात दोन वर्षात 27 हजार 981 घरकुले पुर्ण करण्यात आली आहेत. 2017 ते 2020 या कालावीत एकुण 78 हजार 497 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. उद्दीष्ट साध्य करण्यात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. दरम्यान, ऑनलाईनमध्ये येणा:या अडचणींवर मात करून या उद्दीष्टार्पयत जिल्हा आला आहे. 
2022 पयर्ंत देशातील सर्व नागरिकांना हक्काची घरे देण्याबाबत केंद्र शासनाने महत्वकांक्षी प्रकल्प राबविला आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनानेही केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत शबरी व रमाई आवास योजना यासाठी अभियान स्वरूपात कार्यक्रम चालविला आहे. संपूर्ण राज्यात  18 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत आवास सप्ताह साजरा केला जात असून, नंदुरबार जिल्हा परिषदेतर्फे 20 नोव्हेंबर रोजी आवास दिन साजरा झाला. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील विभागप्रमुखांची क्षेत्रीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होतीे. या अधिका:यांनी जिल्ह्यातील निवडून दिलेल्या गट व गणात जाऊन आवास योजनेबाबत कार्यवाही केली. त्यात सर्वप्रथम पात्र लाभाथ्र्यांचे आवासोफ्ट प्रणालीवर नोंदणी न झालेल्या लाभाथ्र्यांची कागदपत्रे प्राप्त करून घेणे, आवासोफ्ट प्रणालीवर नोंदणी झालेल्या लाभाथ्र्यांची जिओ टॅगिंग करून घेणे, आधार सीडींग करणे, पात्र लाभाथ्र्यांचे बँक पासबुक छायांकीत प्रत प्राप्त करून घेणे.
 हप्ता प्राप्त झालेल्या लाभाथ्र्यांची अडचण समजून घेऊन घरकुलांचे बांधकाम सुरू करणे, प्रगतीपथावरील घरकुलांचे इन्स्पेक्शन झाले नसल्यास अवासोफ्ट अॅपद्वारे इन्स्पेक्शन करून घेणे, घराचे हप्ते मिळाले असतील तर ज्या लेव्हल पयर्ंत काम पूर्ण झाले आहे त्या लेव्हल पयर्ंतचे ई मस्टर जनरेट करण्यात आले. घरकुलाचे काम पूर्ण झाले असून मनरेगा अंतर्गत रक्कम प्राप्त झाली असेल त्या लाभाथ्र्यांचे पूर्णत्वाचे दाखले तयार करून घेणे, अशी विविध कामे या दिवशी करून घेतली गेली. सर्व कामांसाठी लाभाथ्र्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. 
दरम्यान, घरकुलाच्या मंजुरी आणि आर्थिक हप्ता खात्यावर जमा होण्याची ऑनलाईन प्रणाली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होण्याची शक्यता नसते. घरकुल मंजुरीसाठी किंवा हप्त्याची रक्कम    वर्ग होण्यासाठी कुणीही पैशाची मागणी करत असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी     संपर्क साधण्याचे आवाहन     यापूर्वीच करण्यात आले              आहे.
दरम्यान, ऑनलाईन प्रणालीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लाभाथ्र्याना वारंवार    पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागतात. ऑनलाईनची किचकट प्रक्रियामुळे काहीवेळा संबधीत विभागाचे कर्मचारी देखील कंटाळा करून कानाडोळा करतात. 
परिणामी योजनेच्या उद्दीष्टाला अडसर निर्माण होतो. असे असतांनाही नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील अधिकारी व कर्मचा:यांनी या समस्येवर मात करून आपले उद्दीष्ट साध्य करून जास्तीत जास्त     कुटूंबांना निवारा उपलब्ध करून  दिला.    


अक्कलकुवा पंचायत समितीने तत्कालीन गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या कार्यकाळात केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेत एकूण सहा हजार 628 घरकुल पूर्ण केले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पाच हजार 876 घरकुल पूर्ण करुन राज्यात तृतीय क्रमांक मिळविला. गवंडी प्रशिक्षणाद्वारे उत्कृष्ट घर उभारणीत राज्यात सर्वोत्तम कामगीरी केल्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मरिन लाईन्स मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या हस्ते गौरविण्यात आले.एप्रिल ते ऑगस्ट 2018 दरम्यान घरकुलांची दोन हजाराहुन अधिक कामे पूर्ण केल्याबद्दल मुंबई येथे त्यांचा हा गौरव झाला होता. शबरी घरकुल योजनेत 336 घरे, राजीव गांधी निवारा योजनेत 752 घरे, इंदिरा आवास योजनेत सात हजार 363 घरे तथा प्रधानमंत्री  आवास योजने अंतर्गत दोन हजार 70 घरकुले अशी एकुण दहा हजार 561 घरे सप्टेबर 2018 अखेर पूर्ण केली होती.


चार हप्त्यात मिळते 1 लाख 20 हजार अनुदान

 नंदुरबार जिल्ह्यात 2016- 17 ते सन 2019-20 या कालावधीत 79 हजार 186 घरकुले तयार करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी लाभाथ्र्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानुसार 78 हजार 497 घरकुल मंजूर करण्यात आले. त्यापैकी 27 हजार 921 लाभाथ्र्यांनी घरकुलांचे काम पूर्ण केले असून, चालू आर्थिक वर्षात 8,648 घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. घरकुल लाभाथ्र्यांना पहिला हप्ता 15 हजार रुपये, दुसरा हप्ता 45 हजार रुपये, तीसरा हप्ता 40 हजार रुपये व चौथा हप्ता 20 हजार रुपये याप्रमाणे 1 लाख 20 हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या खात्यावर वर्ग केली जात आहे. 
 

Web Title: A refuge of rights for 28 thousand families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.