शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
3
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
4
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
5
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
6
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
7
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
8
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
9
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
10
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
11
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
12
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
13
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
14
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
15
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
16
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
17
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
18
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
19
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
20
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

सलग आठव्यांदा निवडून येण्याचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 11:05 IST

अनिल जावरे।  लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : सलग आठव्यांदा विजय मिळविण्यात अॅड.के.सी.पाडवी यांना यश आले. शिवसेना उमेदवाराला येथे बंडखोरीचा ...

अनिल जावरे। लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : सलग आठव्यांदा विजय मिळविण्यात अॅड.के.सी.पाडवी यांना यश आले. शिवसेना उमेदवाराला येथे बंडखोरीचा फटका बसल्याने त्यांचा निसटता पराभव झाला. शेवटच्या फेरीर्पयत मतमोजणीतील रंगत उत्कंठावर्धक ठरली होती. अक्कलकुवा मतदारसंघ यंदा हॉट मतदारसंघात गणला गेला होता. युतीअंतर्गत ही जागा शिवसेनेला सुटली होती. सेनेतर्फे येथे जिल्हाप्रमुख आमशा फुलजी पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यता घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे धडगाव तालुकाध्यक्ष विजयसिंग पराडके आणि जि.प.सदस्य किरसिंग वसावे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय समिकरणे बदलली. सलग सात वेळा विजयी झालेले अॅड.के.सी.पाडवी यांना रोखण्यासाठी शिवसेनेने हरत:हेने प्रय} केले. परंतु अॅड.के.सी.पाडवी यांनी आपला गड राखण्यात यश मिळविले. बंडखोरीचा फटकायुतीअंतर्गत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने भाजपतर्फे इच्छूक असलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करीत बंडखोरी केली. त्यांची उमेदवारी मागे घेतली जावी यासाठी भाजप आणि शिवसेनेतर्फे हरत:हेने प्रय} केले गेले. परंतु नागेश पाडवी यांनी माघार घेतली नाही. परिणामी या ठिकाणी युतीअंतर्गत बंडखोरी होऊन सरळ होणारी लढत ही तिरंगी झाली. त्यामुळे  रंगतदार ठरलेल्या या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागून होते.रघुवंशी यांची मेहनतप्रचारतंत्र आणि निवडणूक लढविण्याचे नियोजन आत्मसात असलेले आणि राजकीय मुरब्बी नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अक्कलकुवा मतदार संघाच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आपले पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कामाला लावले. अक्कलकुवा, मोलगी आणि धडगाव शहरातील नाराज मंडळींना जवळ घेतले. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची धडगाव येथे जाहीर प्रचार सभा देखील घेतली. परिणामी शिवसेनेच्या उमेदवाराने या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण केली. अॅड.पाडवींचे प्रचारतंत्रगेल्या सात निवडणुकीचा अनुभव असलेले आणि गेल्या 35 ते 40 वर्षापासून कार्यकर्ते जोडल्याने काँग्रेसचे उमेदवार आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी आपल्या प्रचार तंत्राने मतदारसंघात प्रत्येक मतदारार्पयत पोहचण्याचा प्रय} केला. यापूर्वी अथार्त पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अक्कलकुवा मतदारसंघ पिंजून काढला होता. त्याचा फायदाही त्यांना या निवडणुकीत झाला. माजी मंत्री कै.दिलवरसिंग पाडवी यांचे सुपूत्र नागेश पाडवी यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागीतली होती. मात्र हा मदतार संघ शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्याने नागेश पाडवी यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली. या बंडखोरीमुळे महायुतीच्या उमेदवारास मोठा फटका बसल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून येत आहे. अक्कलकुवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अॅड.के.सी. पाडवी यांना 82770 मते मिळाली असून, महायुतीचे उमेदवार आमश्या पाडवी यांना 80,674 मते मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार नागेश पाडवी यांना 21 हजार 664 मते मिळाली आहेत. एकुणच तिरंगी लढतीचा फटका शिवसेनेला बसून काँग्रेस उमेदवार अॅड.के.सी.पाडवी यांनी निसटता विजय मिळविला.