लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून दक्षता म्हणून ग्रामीण भागातील १४ ग्रामीण रुग्णालये आणि ६० प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरासह २९० पेक्षा अधिक उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय पथकांची निर्मिती करण्यात आली आहे़ ग्रामीण भागात कोरोनाचा धोका होण्याची कारणे तपासून विभागाकडून ग्रामस्थांची जागृती करण्यात येत आहे़ यात प्रामुख्याने बाहेरगावाहून येणाऱ्या भूमीपूत्रांना तपासणी करुन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे़ त्यांच्याकडूनही प्रतिसाद देऊन तपासणी करुन घेतली जात आहे़ गेल्या चार ते पाच दिवसात जिल्ह्यात मोठ्या संख्येने पुणे, मुंबई आणि गुजरात राज्याच्या विविध भागातून मूळ निवासी परत आल्याने त्यांच्या तपासण्या केल्या जात आहे़ दुसरीकडे आरोग्य विभागाकडून वसतीगृहांच्या इमारतींचे अधिग्रहण करुन विलगीकरण कक्षांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे़ हे कक्ष कोरोनासोबत लढा देण्यासाठी सज्ज झाले आहेत़बंद केलेल्या टपऱ्यांवर राहणार प्रशासनाचे लक्षप्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पान टपºया बंद ठेवण्याचे आदेश काढले होते़ शनिवारपासून या आदेशांची अंमलबजावणी सुरु झाली आहे़ जिल्ह्यात एकूण २५५ टपºया सिल करण्यात आल्यानंतरही पालिका आणि ग्रामपंचायत प्रशासन त्यावर लक्ष ठेवणार असून दोषींना ५ हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे़नंदुरबारात १३८ पान टपरी सील करण्यात आल्या आहेत़ पालिका कर्मचाºयांच्या पथकाने शनिवारी दिवसभरात ठिकठिकाणी भेटी देऊन याबाबत माहिती दिली होती़ यातून बसस्थानक परिसर, नेहरु चौक, हाटदरवाजा, गांधी पुतळा, इलाही चौक, माळीवाडा, गिरीविहार व सिंधी कॉलनीसह शहरातील इतर मोठ्या चौकात असलेल्या टपºया सिल करण्याची कारवाई करण्यात आली होती़ कारवाईनंतर बºयाच ठिकाणी कडकडीत बंद असल्याने गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन असलेल्यांची प्रचंड आबाळ झाली आहे़ यामुळे चोरटी व छुपी विक्री होण्याची शक्यता असल्याने पोलीस व पालिकेचे भरारी पथक ३१ मार्चपर्यंत फिरुन माहिती घेणार आहेत़याशिवाय शहादा येथे ३७, नवापूर येथे २५, तळोदा येथे ५५ तर खांडबारा येथे २५ पान टपरी सील करण्यात आल्या आहेत. याठिकाणी पालिका, ग्रामपंचायत यांची पथके तपास करुन वेळोवेळी लावलेल्या सीलची माहिती घेणार आहेत़ दरम्यान लपून, छपून कुणी गुटखा, पान विक्री करीत असल्याचे दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे़
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:18 IST