शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

स्वॅब पडताळणीत ‘रॅपिड अँटीजेन’चे यश ७० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:44 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या रॅपिड अँटीजेन टेस्टबद्दल प्रश्न ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या रॅपिड अँटीजेन टेस्टबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत़ अँटीजेनमध्ये आलेला अहवाल आरटी-पीसीआर टेस्टमध्ये बदलून येत असल्याचे प्रकार घडत आहेत़ काही क्षणात कोरोनाचे निदान करणाºया अँटीजेन चाचणीची नंदुरबार जिल्ह्यात मात्र विश्वासार्हता ही ७० टक्के असून दर दिवशी १० पैकी किमान सात टेस्ट ह्या अचूक निदान करत असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे़१४ जुलै रोजी आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रूनेट आणि रॅपिड अँटीजेन या दोन चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत़ कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीसोबत संपर्क तसेच कोरोनाची लक्षणे असलेल्यांच्या चाचण्या याच ठिकाणी करण्यात येत आहेत़ यातून धुळे येथे पाठवले जाणारे स्वॅब आणि तेथून येणारे रिपोर्ट यांची प्रतिक्षा कमी झाली आहे़ रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या रॅग्णाचा रॅपिड अँटीजेन टेस्टचा अहवाल हा काही वेळात आल्यानंतर त्यानुसार उपचार दिला जात आहे़ दरम्यान अँटीजेन टेस्ट नेगेटिव्ह असतानाही एखाद्यात कोरोनाची लक्षणे असल्यास त्याची ट्रूनेट आणि आरटी पीसीआर टेस्ट केली जात आहे़ जिल्ह्यात करण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टच्या एकूण अहवालांमध्ये बदल होण्याचे प्रमाण ३० टक्केच आहे़ दरम्यान आरटी-पीसीआर टेस्टसाठी अद्यापही धुळे येथे स्वॅब पाठवावे लागत आहेत़ जिल्ह्यात रॅपिड टेस्टपूर्वी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही मर्यादित होती़ मात्र अँटीजेन टेस्ट होवू लागल्यानंतर दर दिवशी रुग्ण समोर येत असल्याचे दिसून येत आहे़ यातून गंभीर अशा रुग्णाचा रिपोर्ट तात्काळ समोर आल्यानंतर उपचारांना दिशा मिळत आहे़जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये आजअखेरीस २७६ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत़ यातून ६९ टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या़ तर २०७ रिपोर्ट हे नेगेटिव्ह आले आहेत़दुसरीकडे ट्रूनेट मशिनवर १०५ स्वॅब तपासण्यात आले आहेत़ यातील ३० स्वॅॅब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत़दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आलेल्या टेस्टची पडताळणी करण्यासाठी धुळे येथे पाठवण्यात आले होते़ याठिकाणी आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आल्यानंतर रॅपिड अँटीजेनमधून आलेला रिपोर्ट हा योग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता़यात लक्षणे असतानाही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या अँटीजेन टेस्टची पडताळणी करण्यात आली होती़ यातील केवळ ३० टक्के स्वॅबचे रिपोर्ट हे बदलले असल्याचे समोर आले आहे़ उर्वरित ७० टक्के स्वॅब रिपोर्ट हे जैसे थे राहिल्याची माहिती देण्यात आली आह़े़रॅपिड अँटीजेन हे एक प्रभावी तंत्रज्ञान असल्याचा दावा करण्यात येत आहे़ जिल्हा रुग्णालयात प्रारंभी अँटीजेनच्या ५०० कीट मागवण्यात आल्या होत्या़ आता केवळ २०० कीट शिल्लक राहिल्या आहेत़ या कीट नव्याने मिळाव्यात यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असून लवकरच वाढीव कीट मिळतील अशी माहिती देण्यात आली आहे़जिल्हा रुग्णालयात वापरण्यात येणाºया अँटीजेन टेस्टमुळे गंभीर रुग्णांच्या उपचारांबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे़ यातून मृत्यूदर हा कमी झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे़ एखादा अतीगंभीर रुग्णाचा अहवाल अँटीजेनमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार केले जातात़ त्यानंतर ट्रूनेट आणि धुळे येथील पीसीआरसाठी स्वॅब नमुने पाठवण्यात येतात़ या नमुन्यांचेही अहवाल तंतोतंत खरे आल्याचा दावा करण्यात आला आहे़ एखाद्या रुग्णाचा आधीच मृत्यू झाला असल्यास त्याचे स्वॅबही अँटीजेनद्वारे तपासून निकाल दिला गेला आहे़