शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

‘रॅपिड अँटीजेन’ ठरली आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशभरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढते आहे़ यावर उपाय म्हणून तातडीच्या चाचण्या करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशभरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढते आहे़ यावर उपाय म्हणून तातडीच्या चाचण्या करुन संसर्ग आहे किंवा कसे हे पडताळणीसाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट वापरण्यात येत आहेत़ या टेस्टबद्दल बऱ्याच ठिकाणी शंका उपस्थित होत असल्या तरी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मात्र रॅपिड अँटीजेन टेस्टने केलेली पडताळणी १०० टक्के खरी ठरली असल्याचे समोर आले आहे़रॅपिड अँटीजेनमध्ये एकदा दिलेल निकाल दुसऱ्यांदा उलटत नसल्याचे आतापर्यंत करण्यात आलेल्या टेस्टमध्ये समोर आले आहे़ याबाबत ‘लोकमत’ने सत्यता पडताळणी केली असता, रॅपिड अँटीजेनटेस्ट आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णांसाठी फायदेशीर ठरली असल्याचे समोर आले आहे़ यातून तात्काळ निकाल मिळाल्याने गंभीर रुग्णांना तातडीने बेड उपलब्ध करुन देत त्यांना व्हेंटीलेटर देण्यासह साधी लक्षणे असलेल्या बाधितांना कोविड कक्षांमध्ये दाखल करण्यात येणाºया अडचणी कमी झाल्या आहेत़ १४ जुलै रोजी आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रूनेट आणि रॅपिड अँटीजेन या दोन चाचण्या सुरू करण्यात आल्या होत्या़ १५ आॅगस्टपासून आरटीपीसीआर लॅबही सुरू झाली आहे़ परंतु यापूर्वी वापरात असलेली रॅपिड अँटीजेन आणि ट्रूनेट या दोन्ही चाचण्या आजवर कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची चाचणी करुन निकाल देण्यास सक्षम ठरल्या आहेत़ तिन्ही चाचण्या नंदुरबार येथे सुरू झाल्याने धुळे येथून स्वॅब तपासणी होवून अहवाल येण्याची प्रतिक्षा आता बंद झाली आहे़रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या रॅग्णाचा रॅपिड अँटीजेन टेस्टचा अहवाल हा काही वेळात आल्यानंतर त्यानुसार उपचार दिला जात आहे़ दरम्यान अँटीजेन टेस्ट नेगेटिव्ह असतानाही एखाद्यात कोरोनाची लक्षणे असल्यास त्याची ट्रूनेट आणि आरटी पीसीआर टेस्ट केली जात आहे़ जिल्ह्यात करण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टच्या एकूण अहवालांमध्ये बदल प्रमाण हे नगण्य आहे़दरम्यान आरटी-पीसीआर टेस्ट सुरू झाल्याने प्रशासनाचा ताणही कमी झाली आहे़ आधी अँटीजेन टेस्ट केली जात असल्याने दर दिवशी रुग्ण समोर येत असल्याचे दिसून येत आहे़ यातून गंभीर अशा रुग्णाचा रिपोर्ट तात्काळ समोर आल्यानंतर उपचारांना दिशा मिळत आहे़४जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये आजअखेरीस ५१२ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत़ यातून ११३ टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या़ तर ३९९ जणांचे रिपोर्ट हे नेगेटिव्ह आले आहेत़४दुसरीकडे ट्रूनेट मशिनवर २४१ स्वॅब तपासण्यात आले आहेत़ यातील ६६ स्वॅॅब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत़४१५ आॅगस्टपूर्वी अँटीजेन किंवा ट्रूनेट मशिनमध्ये पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह स्वॅबची पडताळणी करण्यासाठी धुळे येथील आरटीपीसीआर मशिनमध्ये होत होती़ परंतु आता ही लॅब नंदुरबार येथेही सुरू झाली असल्याने हा ताण कमी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे़४गेल्या महिन्यात २७ जुलै ते १८ आॅॅगस्टदरम्यान करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट ह्या १०० टक्के यशस्वी ठरल्या आहेत़ पॉझिटिव्ह असल्यास इतर दोन्ही मशिनवरही स्वॅब रिपोर्ट हा पॉझिटिव्ह येत आहे़ तर निगेटिव्ह असल्यास त्याचीही पडताळणी सत्य होत आहे़४रॅपिड अँटीजेन हे चाचणी करण्यात प्रभावी ठरल्याने जिल्हा रुग्णालयात ८०० कीट मागवण्यात आल्या आहेत़ यातून तातडीने चाचण्या करण्याचे काम सुरु आह़े़ एखाद्या रुग्णाची स्थिती ही गंभीर असल्यास अँटीजेनद्वारे पडताळणी करुन उपचार करता येतात़ त्याला कोरोना नसल्यास इतर आजारांवरच्या इलाजांचे मार्गदर्शन केले जाते़४जिल्ह्यात आरटी पीसीआर ही टेस्ट नव्याने सुरू करण्यात आली आहे़ या लॅबमध्ये मंगळवारी २२ जणांच्या चाचण्या करण्यात येत होत्या़४आरटी पीसीआर लॅबमध्ये जाणारे कर्मचारी हे पूर्णपणे पीपीई कीटमध्ये दिसून आले़ तर दुसरीकडे रॅपिड अँटीजेन टेस्ट अगदी साध्या पद्धतीने करण्यात येऊन निकालही लागलीच सांगण्यात आला़ रॅपिड टेस्ट करणारे कर्मचारी मास्क, हँडग्लोव्हज यासह इतर साहित्याचा वापर करतात़रॅपिड अँटीजेनमध्ये पॉझिंिटव्ह आलेला अहवाल ट्रूनेट आणि आता आरटी-पीसीआर या दोन्ही ठिकाणी कायम रहात आहे़ १०० टक्के अहवाल हे खात्रीशीर आले आहेत़ आपल्याकडे चाचणीच्या तीन पद्धतींमुळे अडचणी कमी झाल्या आहेत़-डॉ़ के़डी़सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबाऱ