शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मार्ग बनला स्थलांतरीतांचा पायवाटेचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:34 IST

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे सध्या प्रवासी रेल्वे सेवा बंद असल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्ग सध्या परराज्यातील ...

रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे सध्या प्रवासी रेल्वे सेवा बंद असल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्ग सध्या परराज्यातील मजुरांच्या पायवाटेचा मार्ग बनला आहे. रोज शेकडो मजूर या वाटेवरून प्रवास करीत असून, त्यांना थांबवून त्यांची जबाबदारी कोण घेणार या भूमिकेतून या मजुरांचा शेकडो किलोमीटरचा मार्गही सुकर होत आहे.लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या मजुरांची अवस्था दयनिय झाली आहे. गाव सोडून शेकडो किलोमीटर अनोळखी परिसरात रोजगारासाठी कामाला आलेल्या मजुरांना सध्याच्या स्थितीत कुणी वाली नसल्याची अवस्था आहे. माणुसकीच्या नात्याने दोन-चार दिवस अनोळखी ठिकाणी खान्या पिण्याची व्यवस्था होते. पण पंधरा-पंधरा दिवस मात्र त्यांना अपेक्षित सोयीसुविधा मिळणे काहीसे अवघडच झाले आहे. त्यामुळे परराज्यात अडकलेले मजूर लॉकडाऊन वाढल्याने आता हळू हळू आपल्या गावाकडची वाट धरत आहेत. गाव शेकडो किलोमीटर लांब असले तरी घोळक्या घोळक्याने हे मजूर पायीच ‘जो होगा देखा जायेगा’ या भावनेतून गावाकडे निघाले आहेत. सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर गेल्या आठवड्याभरापासून येणाऱ्या मजुरांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. रेल्वे मार्ग धरून त्यावरच पायी हे मजूर येत आहेत. सुरतहून मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेशातील गावांमध्ये जाण्यासाठी हे मजूर निघाले आहेत.सोमवारी सुरतहून मध्यप्रदेशातील जबलपूरला जाणारे १४ मजूर नंदुरबार येथील रेल्वे बोगद्या जवळ रेल्वे मार्गावरच पोलिसांनी अडवले. तीन दिवसांपासून ते सूरतहून निघाले आहेत. या मजुरांशी चर्चा केली असता ते सुरतहून निघाल्यापासून रेल्वे मार्गाने रस्त्यावर ते थांबत थांबत येत आहेत. ज्याठिकाणी ते थांबले तेथे गावकऱ्यांकडून जेवणाची व्यवस्था होत आहे. काही ठिकाणी पोलिसांनीही अडविले. त्यांनीही खाण्यापिण्यासाठी दिले. लोकांचा हा पाहूणचार घेत ते गावाकडे निघाले आहेत. असाच प्रवास सुरू राहिला तर साधारणत: १५ दिवसात ते गावाला पोहोचतील असा त्यांना विश्वास आहे.दरम्यान, या मजुरांसदर्भात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे सूचना केली असता त्यांनी त्या मजुरांना शेल्टर होममध्ये ठेवता येत नसल्याचे सांगितले. हे मजूर नियम तोडून येत असल्याने त्यांना जिल्ह्याच्या सिमेवरच अडवून पोलिसांनी कारवाई करायला हवी होती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दुसरीकडे या मजुरांवर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस प्रशासनही धजावत आहेत. अर्थातच त्यामागची कारणे काहीही असली तरी परराज्यात स्थलांतरीत असलेल्या मजुरांच्या सोयीसुविधांबाबत तेथील स्थानिक सरकारच्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे दिसून येत आहे.साहब तीन दिनसे पैदल चल रहे है, कहाँ पुलीस का दंडा मिला तो कही पे लोगोने खाना खिलाया. रस्ते मे कुछ भी मिलो सब सहके घरतक पोहोचना है. क्योकी आगे क्या होगा कोई भरोसा दिखता नही.-सुरेशकुमार, स्थलांतरीत मजूर, जबलपूर