शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

शहादा बसस्थानकाचा प्रश्न सुटता सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा बसस्थानकातील समस्या सुटता सुटत नसल्याने बसस्थानक म्हणजे शहादेकरांसाठी अवघड जागेचं दुखणं झाले   ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा बसस्थानकातील समस्या सुटता सुटत नसल्याने बसस्थानक म्हणजे शहादेकरांसाठी अवघड जागेचं दुखणं झाले            आहे. शहादा आगार धुळे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणा:या आगारांपैकी एक आहे. असे असले तरी या आगारातील समस्यांकडे परिवहन महामंडळाच्या सर्वच प्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्याने शहादा आगार समस्यांचे आगार झाले आहे. या आगारातून मुंबई, पुणे,  औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सुरत आदी लांब पल्ल्यांच्या गाडय़ा सुरू आहेत. प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार आत्ताच परळी, वैजनाथ, पंढरपूर, जेजुरी आदी गाडय़ा नव्याने सुरू करण्यात आलेल्या आहेत.शहादा तालुक्यात साखर कारखाना, सुतगिरणी, शिक्षण संस्था याच बरोबर बाजारपेठ मोठी असल्याने प्रवासी संख्या मोठी आहे. अहमदाबाद, इंदौर, बडोदा, शेगांव, वापी, बुलढाणा, कल्याण इ. लांब पल्ल्याच्या नवीन फे:या सुरू करण्याची तसेच पुणे, मुंबई, नाशिक सुरतसाठी फे:या वाढवण्याची गरज असतांना या फे:या सुरू करण्यात येत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. चांगले उत्पन्न देणा:या गाडय़ा अचानक बंद करण्यात येतात. त्यामुळे आगाराच्या उत्पन्नात घट होत असूनही, अधिका:यांकडून या आगाराकडे दुर्लक्ष केले जाते. आगारातून होणा:या दररोजच्या फे:या लक्षात घेता चालक वाहकांची संख्या तोकडी असल्याने दररोजच्या फे:या पूर्ण करण्यासाठी शहादा आगारातील अधिका:यांना चालक-वाहकांची जुळवाजुळव करण्याची कसरत करावी लागते. अनेकदा बसेस, चालक, वाहक अभावी फे:या उशिरा सोडणे किंवा रद्द करण्याची पाळी येते. त्यामुळे प्रवाशांची ऐनवेळी धांदल होते. आरक्षण करूनही बसफे:या रद्द होत असल्याने प्रवाशांची फजिती होते.शहादा बसस्थानकातील खड्डे आणि अतिक्रमणहीदेखील एक मोठी समस्या आहे. बसस्थानकात चोहीकडे मोठमोठे खड्डे असल्याने स्थानकात खड्डे चुकवून बस चालविण्याची कसरत चालकांना करावी लागते. पावसाळ्यात तर स्थानकांची अवस्था बेटांसारखी होते. खड्डे आणि चिखल सांभाळत पावसाळ्यात बस शोधण्याची कसरत प्रवाशांना करावी लागते.गेल्या अनेक वर्षापासून खड्डय़ांची ही समस्या कायम असूनही परिवहन महामंडळाच्या अधिका:यांकडून दुर्लक्षित आहे. हे विशेष. शहादा बसस्थानकात खाजगी दुचाकी, चारचाकी वाहने उभी करण्यास वाहनतळ नसल्याने स्थानकाच्या इन आणि आऊट प्रवेशद्वाराजवळ जागा मिळेल तेथे प्रवाशांचे नातलग वाहने उभी करत असल्याने बस आत घेतांना किंवा बाहेर काढतांना बस चालकांनाच रस्ता शोधावा लागतो, अशी स्थिती आहे. त्यातच स्थानकाच्या दोन्ही गेट जवळ मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाल्याने बस चालविण्याची कसरत चालकांना करावी लागते. स्थानकात डय़ुटीवरील पोलीस कोणाचाल दिसत नसल्याने चोरांना आणि वाहनचालकांना त्याचा धाक वाटत नाही. आगारातील अधिकारी आणि पोलीस कोणीही याकडे लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत आहे.