शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

वर्ढे टेंभे येथे विहिरीत पडलेला बिबट्या सुखरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:47 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील वर्ढे टेंभे येथे भक्ष्याचा पाठलाग करीत असताना अडीच ते तीन वर्षे वयाचा बिबट्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील वर्ढे टेंभे येथे भक्ष्याचा पाठलाग करीत असताना अडीच ते तीन वर्षे वयाचा बिबट्या विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप जेरबंद केले असून दोंडाईचा रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयात ठेवले आहे. विहिरीत पडलेला बिबट्या व त्याचा भक्ष्य असलेला कुत्रा दोघांनाही वाचविण्यात यश आले आहे. बिबट्या व कुत्र्यामध्ये सुमारे दोन ते अडीच तास सुरू असलेल्या द्वंद्वात कुत्र्याच्या भुंकण्यामुळे व बिबट्याच्या डरकाळ्यांंनी परिसर दणाणून गेला होता.शुक्रवारी सकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान वर्ढे टेंभे गावातील ग्रामपंचायत कार्यालयनजीकच्या जुन्या व कोरड्या विहिरीत कुत्र्याचा पाठलाग करीत असताना बिबट्या पडल्याची घटना घडली. सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान या विहिरीजवळील वसाहतीतील नागरिकांना कुत्र्याचे भुंकणे व डरकाळ्या ऐकू आल्याने ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली असता ३५ ते ४० फूट खोल असलेल्या विहिरीत बिबट्या आढळून आल्यानंतर त्यांनी या घटनेची खबर वनविभागाला दिली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनक्षेत्रपाल अनिल पवार, वनपाल एस.एस. इंदवे, एस.एस. देसले, वनरक्षक प्रवीण वाघ, संतोष राठोड, एस.जी. मुकाडे, आर.ए. ठाकरे, के.एम. पावरा, वाय.बी. पिंजारी, जी.आर. वसावे, आर.झेड. पावरा, वाहन चालक आबा न्याहळदे, नईम मिर्झा, एस.जे. वाघ यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक असलेल्या पिंंजऱ्यासह धाव घेतली. तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील नाना पाटील यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी उपस्थित होत त्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले.गावातील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती मिळाल्याने आजूबाजूच्या खेड्यांवरील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. गर्दीला नियंत्रित करण्यासह बिबट्याला सुरक्षित जेरबंद करण्याचे आव्हान पोलीस व वनविभागासमोर होते. बिबट्याच्या डरकाळ्या व नागरिकांची आरडाओरड यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागाला यावेळेस उपस्थित नागरिकांना सौम्य लाठीमार करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाºयांनी पिंजरा विहिरीत सोडला. त्यानंतर अर्ध्या तासाच्या कालावधीनंतर बिबट्या पिंजºयात अडकला. बिबट्या सुरक्षितरित्या पिंजºयात जेरबंद झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाºयांनी पिंजरा विहिरीबाहेर काढला व बिबट्याला विभागाच्या दोंडाईचा रस्त्यावरील कार्यालयात आणले. सध्या बिबट्या सुरक्षित असून त्याला वरिष्ठांच्या सूचनेनुसार सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक एस.बी. केवटे व सहायक उपवनसंरक्षक आर.एच. झगडे यांनी दिली.बिबट्याला सुरक्षित जेरबंद केल्यानंतर या परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीन ते चार बिबट्यांचा संचार असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. या माहितीनंतर वनविभागाने परिसरातील बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.