शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

नंदुरबार जिल्ह्यात यंदा चार वाळू घाटाचे लिलाव करण्याचे प्रस्तावित असतांना दोन घाटांचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा चार वाळू घाटाचे लिलाव करण्याचे प्रस्तावित असतांना दोन घाटांचे लिलाव झाले आहेत. आता दोन घाटांची लिलाव प्रक्रिया ही पर्यावरण मानकांच्या नियमांमुळे रखडणार आहे.  न्यायालयाच्या निर्णयाआधारे शासनाने आता नवीन वाळू धोरण तयार केले आहे. त्यामुळे यंदा दोनच घाट राहतील अशी शक्यता आहे. परिणामी वाळूच्या चोरटय़ा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा चार वाळू घाटाचे लिलाव करण्याचे प्रस्तावित असतांना दोन घाटांचे लिलाव झाले आहेत. आता दोन घाटांची लिलाव प्रक्रिया ही पर्यावरण मानकांच्या नियमांमुळे रखडणार आहे.  न्यायालयाच्या निर्णयाआधारे शासनाने आता नवीन वाळू धोरण तयार केले आहे. त्यामुळे यंदा दोनच घाट राहतील अशी शक्यता आहे. परिणामी वाळूच्या चोरटय़ा वाहतुकीला जोर येण्याची शक्यता आहे. तापीची वाळू सर्वदूर प्रसिद्ध आहे. स्थानिकसह थेट नाशिक, मुंबईला येथील वाळू पाठविली जाते. त्यामुळे येथील वाळूला सोन्याचे मोल मिळते. परिणामी वाळू ठेके घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर स्पर्धा असते. शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात 20 वाळू घाट आहेत. त्यापैकी सर्वात मोठे आणि सर्वाधिक वाळू घाट हे नंदुरबार व शहादा तालुक्यात आहेत. या घाटांच्या लिलावासंदर्भातील प्रस्ताव पाठवितांना आवश्यक त्या बाबींचा विचार करून प्रस्ताव पाठविण्यात येत असतात. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून घाटांची संख्या कमी होत गेली आहे. गेल्यावर्षी केवळ तीनच घाट होते. यंदा चार घाट प्रस्तावीत करण्यात आले होते. पैकी दोन ठिकाणचा लिलाव झाला असून दोन ठिकाणी रखडला आहे.सावळदे व ससदेचा लिलावनंदुरबार महसूल प्रशासनाने वाळू घाटाची ई-लिलाव प्रक्रिया मार्च 2013 च्या परिपत्रकान्वये सुरू करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सावळदे व ससदे-2 या घाटांचा लिलाव करण्यात आला. कोटय़ावधींना गेलेला हा लिलाव जिल्हा प्रशासनाला चांगला महसूल देवून गेला. तशाच महसुलाची अपेक्षा बिलाडी व ससदे-1 या वाळू घाटांपासून होती. परंतु नवीन नियमांमुळे ही प्रक्रिया अडकली आहे.गेल्यावर्षी केवळ तीन ठिकाणी वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला होता. त्यात नांदरखेडा, बामखेडा व बोकळझर, ता.नवापूर येथील घाटांचा समावेश होता.नवीन निर्णयाची आडकाठीउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार आता पर्यावरण व्यवस्थापन योजना अर्थात एन्व्हायरोमेंट मॅनेजमेंट प्लॅन ही प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यात गौण खनिजाचे उत्खनन करीत असतांना आगामी पाच वर्षासाठी अॅक्शन प्लॅन काय आहे? याचा अहवाल द्यावा लागणार आहे. त्यानंतरच न्यायालयाच्या पुढील आदेशान्वये रेतीघाटांचे लिलाव होणार आहेत. याशिवाय 3 जानेवारीचा शासन आदेशात वाळू निर्गतीसंदर्भात  सुधारीत धोरण जाहीर केले आहे त्याचाही अवलंब करावा लागणार आहे.यंदा अनेक गावांचा विरोधशासनाने परवाणगी दिल्यापेक्षा अधीक वाळू उपसा करण्याचे षडयंत्र कायमचेच आहे. यामुळे परिसरातील पर्यायवरणाला धोका निर्माण होतो.  याशिवाय वाळूने भरलेली जड वाहने ग्रामिण भागातील रस्त्यांवरून गेल्यावर त्या रस्त्यांची अवस्था अतिशय    खराब होते. परिणामी ग्रामस्थांना    त्रास सहन करावा लागतो. असे रस्ते वर्षानुवर्ष दुरूस्त केले जात नाही. ज्या गावांच्या हद्दीत घाट असतो त्या गावाच्या विकास निधीत त्यातील काही रक्कम दिली गेली पाहिजे अशी मागणी देखील आहेच. या सर्व कारणांमुळे यंदा अनेक गावांनी ग्रामसभेत ठराव करून वाळू घाटास विरोध केला. त्यामुळे 16 ते 17 ठिकाणी वाळू घाट असतांना यंदा केवळ चारच ठिकाणचे प्रस्ताव पाठविण्यात आले. हे चारही तापीवरील घाट आहेत.