शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

प्रचार तोफा थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 11:35 IST

नंदुरबार : गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेली जाहीर प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी पाच वाजता थंडावली. आता रविवारी मतदान साहित्य ...

नंदुरबार : गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेली जाहीर प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी पाच वाजता थंडावली. आता रविवारी मतदान साहित्य वाटप करून सोमवारच्या मतदानाची तयारीसाठी प्रशासन सज्ज होत आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांनी देखील जास्तीत जास्त मतदार मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी नियोजन करीत आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात गेल्या 13 ते 14 दिवसांपासून जाहीर प्रचारात सर्वच उमेदवारांनी आपले कौशल्य पणाला लावले होते. भाजप, शिवसेना या पक्षांनी आपल्या राष्ट्रीय व राज्य नेत्यांना प्रचारासाठी पाचारण केले होते. तर काँग्रेस व इतर पक्षांनी स्थानिक स्तरावरच प्रचाराला प्राधान्य दिले होते. गेल्या दोन दिवसात प्रचार रॅली, जाहीर सभा यांची रेलचेल होती. शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रय} केला. शेवटच्या क्षणार्पयत अर्थात पाच वाजेर्पयत प्रचार सुरू होता.

या मुद्यांवर केला प्रचार

1 आदिवासींच्या आरक्षणासंदर्भात भाजप व काँग्रेसने एकमेकांवर आरोप केले. प्रत्येक सभेत याबाबत दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप झाले. राष्ट्रीय व राज्य नेत्यांनी देखील हा प्रश्न लावून धरला. 2 जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा देखील प्रचार काळात समोर आला. सत्ताधारी व विरोधक यांनी कुणी विकास केला यावरच दावे-प्रतिदावे केले. दोन्ही गटाने आपणच विकास केला यावर ठामपणे दावा करण्याचा प्रय} केला गेला.  3 सिंचनाचा प्रश्न देखील गाजला. जिल्ह्यातील बॅरेज्स कुणी मंजुर केल. कुणाच्या काळात बांधले गेले, कुणी पाणी आडवले यावर चर्चा झडल्या.4 नंदुरबारचा औद्योगिक विकास झाला नाही. कुणामुळे जिल्हा मागास राहिला. औद्योगिकरण का रखडले याबाबतत प्रत्येकांच्या सभांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. नंदुरबार, नवापूर व शहाद्याच्या एमआयडीसीबाबत ते दिसले.

या घटनांनी वेधले लक्षशहादा : भाजपने विद्यमान आमदारांचे तिकिट कापून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली. या नाटय़मय घटनेचे पडसाद उमेदवारी दाखल करण्यार्पयत कायम राहिले.नंदुरबार : काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात आधी जाहीर केलेला उमेदवार ऐनवेळी बदलला. भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसची उमेदवारी मिळविली.अक्कलकुवा : मतदारसंघात युतीअंतर्गत शिवसेनेचा उमेदवार असतांना भाजप पदाधिका:याने या ठिकाणी बंडखोरी केली. त्यामुळे येथे तिरंगी लढत रंगली. यांच्या झाल्या सभाशहादा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. धडगाव : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली.नवापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांची सभा झालीतळोदा : भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांची सभा झाली.सर्वाधिक सभा भाजपच्याजिल्ह्यातील चार पैकी तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार असल्याने भाजपने तीन सभा घेतल्या. मात्र, नंदुरबार मतदारसंघात कुणीही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही. शिवसेनेतर्फे एका मतदारसंघात उमेदवार आहे. तेथे पक्ष प्रमुखांची सभा घेण्यात आली. काँग्रेसचे चारही जागांवर उमेदवार असतांना या ठिकाणी कुणाही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही. स्थानिक स्तरावर उमेदवारांनीच प्रचार सभा घेतल्या.

सैनिक मतदार..4जिल्ह्यात 401 सैनिक मतदार आहेत. त्यात अक्कलकुवा मतदारसंघात 43, शहादा मतदारसंघात 146, नंदुरबार मतदारसंघात 157 तर नवापूर मतदारसंघात 55 सैनिक मतदारांचा समावेश आहे. 

असा राहिल पोलीस बंदोबस्तनिवडणूकीसाठी जिल्ह्यात एक पोलीस अधिक्षक, एक अपर अधीक्षक, चार उपअधीक्षक, पंधरा, पोलीस निरिक्षक, 47 सहायक पोलीस निरिक्षक, 1 हजार 94 पोलीस कर्मचारी, 855 होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आह़े 

अशा रंगल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देवेंद्र फडणवीसशहादा : विरोधकांनी आपल्या सत्तेच्या काळात केवळ लोकांना भुलवत ठेवल्ंो. विविध कल्याणकारी योजनांची वाट लावली. पाच वर्षाच्या भाजप सरकारने लोकांर्पयत योजना पोहचविल्या. त्यामुळे ख:या अर्थाने विकासाला चालना मिळाली.

अमित शहानवापूर : आदिवासींच्या उत्थानाचे काम हे भाजप सरकारने केले आहे. आदिवासी, दलित, ओबीसी यांचा केवळ मतांसाठी वापर यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने केला आहे. येत्या काळात जास्तीत जास्त योजना तळागाळार्पयत पोहचविण्याचा प्रय} आहे.

उद्धव ठाकरेधडगाव : आदिवासींच्या आरक्षणला कुणीही हात लावू शकत नाही. त्यांचा हक्क, त्यांचे कायदे हे अबाधीत राहणार आहे. शिवसेनेने नेहमीच तळागाळातील लोकांच्या हिताचे संरक्षण केले आहे. त्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा दिला आहे. 

अॅड.के.सी.पाडवीअक्कलकुवा : आदिवासींच्या योजना कमी करणे, आरक्षण हटविणे असे प्रकार भाजप सरकार करू पहात आहे. टीबीटीच्या माध्यमातून सरकारने विद्याथ्र्याना जेरीस आणले आहे. शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्याचे प्रकार सुरू आहेत.

चार मतदारसंघातील स्थिती जिल्ह्यात एकूण चार मतदार संघ आहेत़ यात अक्कलकुवा मतदारसंघात सहा उमेदवार रिंगणात असून 349 मतदान केंद्रे आहेत़  शहादा मतदार संघात चार उमेदवार रिंगणात तर 339 मतदारसंघ आहेत़ नंदुरबार मतदारसंघात सहा उमेदवारांचे भवितव्य 361 मतदान केंद्रात बंद होईल़ नवापुर मतदार संघात 10 उमेवारांसाठी मतदार 336 मतदान केंद्रात मतदान करतील़