शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

भाजीबाजारात हिरव्या भाज्यांचे दर गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:08 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पावसाने दिलेल्या खंडामुळे भाजीपाला उत्पादन घटले आहे़ यातून बाजार समितीत ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात पावसाने दिलेल्या खंडामुळे भाजीपाला उत्पादन घटले आहे़ यातून बाजार समितीत होणारी भाजीपाला आवक कमी होवून भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत़ यात नंदुरबार बाजार समितीत भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार रात्री होत असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत़नंदुरबार बाजार समितीत तालुक्याच्या विविध भागासह लगतच्या धुळे जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातून नियमित भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो़ तीन महिन्यांपूर्वी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर बाहेरील जिल्ह्यातून होणारा भाजीपाला पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता़ लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर ही आवक पूर्ववत होणे अपेक्षित होते़ परंतू नंदुरबार बाजार समितीत भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार हे रात्री सुरू झाल्याने ही आवक वाढण्याऐवजी कमीच राहिली आहे़ तूर्तास नंदुरबार तालुक्यात पावसाने दिलेल्या खंडामुळे भाजीपाल्याची आवक आणखी कमी होवून दरांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे़ टोमॅॅटोसह हिरवा भाजीपाला ५० रुपये किलोपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याने सामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे़ बाजारात सहजपणे नजरेस पडणारा टोमॅटो महाग झाल्याने गृहिणींचीही पंचाईत झाली आहे़ सोबत पावसाळ्यात मुबलक मिळणाºया भाज्यांचे दर हे प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी वाढले असल्याने खरेदीवर परिणाम झाला आहे़या कारणामुळेभाज्यांचे भाव वाढले४ठोक बाजारात भाज्यांची आवकच कमी असल्याने भाव वाढले आहेत़ वाहतूक व्यवस्थाच नसल्याने शेतकरी येऊ शकत नाहीत़ यातून बºयाच जणांनी गेल्या तीन महिन्यात भाजीपाला लागवडीला ब्रेक दिला आहे़४लॉकडाऊनपूर्वी भाव खाणारा कांदा लॉकडाऊन काळात स्वस्त झाला होता़ यातून वाहतूक व्यवस्था नसल्याने अनेकांनी कांदा पीक शेतात सोडून दिले़ तर काहींनी कांदा थेट पाळीव शेळ्या-मेंढ्या आणि गुरांना टाकून दिला़४पावसाने ताण दिल्याने लागवड केलेला भाजीपाला गेल्या ३० दिवसात फूलू शकलेला नाही़ यातून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणाव नुकसान झाले असून अनेक ठिकाणी भाजीपाला पिकांवर मर आला आहे़भेंडी स्वस्त परंतू खरेदीत सुस्तनंदुरबार आणि नवापूर तालुक्यात भेंडीचे मुबलक उत्पादन घेतले जाते़ यंदाही बाजारात भेंडीची आवक आहे़ यातून किलोमागे ३० रूपयांपर्यंत भेंडी भेटत आहे़ मात्र दर कमी असतानाही आवक भरपूर असल्याने भेंडीची म्हणावी तशी खरेदी होत नसल्याचे चित्र सध्या बाजारपेठेत दिसून आले आहे़ भेंडी विक्रेते दिवभरात चार ते पाच किलो भेंडी किरकोळ स्ववरूपात विक्री करत आहेत़बाजारपेठेत लिंबूच्या दरांमध्ये मात्र घट आल्याचे चित्र आहे़ तालुक्याच्या विविध भागात यंदा लिंबू बागा बहरल्या आहेत़ यातून लिंबू ठोक बाजारात २० रूपये किलो दराने मिळत आहे़ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिंबाची मोठी विक्री होत आहे़ बाजारात दर दिवशी १०० कॅरेटपेक्षा अधिक लिंबू विक्रीसाठी शेतकरी घेऊन येत आहेत़टोमॅटोला सफरचंदाचा भावनंदुरबारच्या बाजारात तूर्तास टोमॅटो हा ३० ते ४० रूपये किलो दराने मिळत आहे़ दोन दिवसांपूर्वी टोमॅटो ५० रूपयांच्या पुढे गेला होता़ ठोक बाजारात दिवसाला २०० कॅरेटपर्यंतच मालाची आवक होत असल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे़