प्रतिष्ठानचे प्रदीप पाटील, प्रा.ज्ञानी कुलकर्णी, प्रा.संपत कोठारी व प्रा.अनिल साळुंके यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांची भेट घेऊन वनमहोत्सवाची माहिती दिली व त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. या वेळी डॉ.भारुड यांनी वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक करुन मार्गदर्शन व सूचना दिल्या. आपल्या कार्यात लोकसहभाग वाढवावा, सामाजिक अंतर राखून आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. ड्रोन कॅमेराद्वारे फोटो व कार्याचे शुटींग करावी. त्याची दखल म्हणून आपण स्वत: मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. २१ हजार रोपांचे वृक्षारोपणाचे व वृक्षसंवर्धनाचे आपले उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्याने करावे, अशी अपेक्षा डॉ.भारुड यांनी व्यक्त केली. जुलै महिन्यात होणाऱ्या वनमहोत्सव सप्ताहात मी आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे वनमहोत्सवाची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST