अवकाळी पावसाने पुन्हा उडविली दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:58 PM2019-11-09T12:58:21+5:302019-11-09T12:58:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दुस:या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, ...

Precipitation rains again | अवकाळी पावसाने पुन्हा उडविली दाणादाण

अवकाळी पावसाने पुन्हा उडविली दाणादाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात दुस:या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, नंदुरबार बाजार समितींमध्ये व्यापा:यांनी खरेदी केलेला मका पावसात सापडल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम प्रकल्पांवर प्रशासनाने लक्ष ठेवले असून पाण्याची आवक वाढताच विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
जिल्ह्यात दुस:या दिवशीही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी काही काळ उकाढा वाढला देखील होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मात्र अचानक पावसाला सुरुवात झाली. काही भागात तुरळक सरी होत्या तर अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होता. साधारणत: अर्धा ते पाऊण तास पावसाचा जोर कायम होता. रात्री उशीरार्पयत पावसाची रिपरिप कायम होती. 
उभ्या पिकाचे नुकसान
शेतात उभे असलेले कापूस, पपई, मका या पिकाचे या पावसामुळे नुकसान झाले. तर अनेक शेतक:यांनी सोयाबीन, बाजरी व इतर पिके काढून घेतल्याने त्यांचे नुकसान टळले. परंतु शेतात झाकून ठेवलेला शेतीमालाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वेचणीवर आलेल्या कापसाला सर्वाधिक फटका बसला आहे. दोन दिवसांवर वेचणीसाठी असलेला कापूस या पावसामुळे पुर्णपणे भिजला असल्याने त्याचा काहीही उपयोग राहणार नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतक:यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 
25 लाखांचे नुकसान
नंदुरबार बाजार समितीत शुक्रवारी लिलाव प्रक्रिया बंद होती. परंतु काही शेतक:यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला होता. शेतक:यांनी आणलेला शेतीमाल व्यापा:यांनी खरेदी करावा असा आग्रह धरला. व्यापा:यांनी खरेदी करून तो खुल्या जागेत वाळत टाकण्यासाठी ठेवला. परंतु दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे खरेदी केलेला जवळपास दीड हजार क्विंटल मका पाण्यात सापडल्याने मोठे नुकसान झाले. सध्या पावसाचे वातावरण पहाता बाजार समितीतर्फे मंगळवार्पयत खरेदी-विक्री व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नंदुरबार बाजार समितीत शुक्रवारी लिलाव होणार नसल्याचे जाहीर करण्यात आलेले असतांनाही काही शेतक:यांनी मका विक्रीसाठी आणला होता. बाजार समितीने व्यापा:यांना आवाहन करून लिलाव करण्यास भाग पाडले. परंतु खरेदी केलेला मका उघडय़ावरच राहिल्याने दुपारी आलेल्या पावसात मका भिजून तो वाहून गेला. यामुळे व्यापा:यांच्या मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. सायंकाळी पाण्यात वाहणारा मका गोळा करण्यासाठी व्यापारी व हमालांची कसरत झाली. दरम्यान, पुढील सुचना होईर्पयत शेतक:यांनी शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये असे आवाहन बाजार समितीतर्फे सभापती किशोर पाटील व सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे. 
व्यापा:यांचा हिरमोड
पावसाची रिपरिप आणि शेतक:यांचे झालेले नुकसान याचा फटका व्यापा:यांना बसला आहे. बाजारातील उलाढाल गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मंदावली आहे. शुक्रवारी तर बाजारपेठेत शुकशुकाट होता. आता तुळशी विवाहानंतर लगAसमारंभ सुरू होणार आहेत. त्यामुळे व्यापा:यांना आशा लागून आहे. परंतु वारंवारचा बेमोसमी पाऊस आणि शेतक:यांचे नुकसान यामुळे या सिझनवरही परिणाम होईल की काय अशी भिती व्यापा:यांना सतावत आहे.
 प्रकल्पांमधू विसर्ग सुरू
जिल्ह्यातील शिवण, नागण व सुसरी प्रकल्पातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाऊस वाढला तर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले आहे. नदी, नाल्यांचा प्रवास सुरूच असल्याने या प्रकल्पांमधून काही प्रमाणात विसर्ग सुरू आहेत. अनेक भागात पाऊस सुरू असल्याने पुन्हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून सद्य स्थितीत 50 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागन प्रकल्पातून 35 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. सुसरीमधून विसर्ग सुरू नाही. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्यास सुसरीचाही विसर्ग सुरू होणार आहे.  नदी, नाल्यांना पूर येवून पाणी या प्रकल्पांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग कधीही वाढविण्यात येणार आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्वच नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावर आणि नाल्यांमध्ये अतिक्रमण केले असल्यास ते काढून घ्यावे. पाणी सुरू असतांना नदी, नाले ओलांडण्याचा प्रय} करू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Precipitation rains again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.