जळगाव: भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टीस्टेट पतसंस्थेत ठेवलेली २५ लाख ८१ हजार ८०२ रुपयांची रक्कम मुदत संपल्यानंतरदेखील परत न करता विश्वासघात व अपहार केला. याप्रकरणी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांच्यासह १५ जणांविरुद्ध सोमवारी पहाटे तीन वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. रायसोनी यांच्यासह १३ जणांना अटक झाली असून न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.शिवकॉलनी भागातील रहिवासी व सेवानिवृत्त उपप्राचार्य शिवराम चावदस चौधरी यांच्यासह काही ठेवीदारांनी शिवकॉलनीतील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या शाखेत मुदतपूर्व ठेवीच्या स्वरूपात २५ लाख ८१ हजार ८०२ रुपयांची ठेव ठेवली होती. मात्र ठेवीच्या रकमेची मुदत संपल्यानंतरदेखील पतसंस्थेच्या संचालकांनी व व्यवस्थापकांनी फिर्यादी चौधरी यांच्यासह अन्य ठेवीदारांना ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. शिवराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी (रा.बळीराम पेठ, जळगाव), अध्यक्ष दिलीप कांतीलाल चोरडिया, संचालक मोतीलाल ओंकार जिरी (रा.शेळगाव, ता.जामनेर), सुरजमल भबुतमल जैन, दादा रामचंद्र पाटील (रा.शेळगाव, ता.जामनेर), भागवत संपत माळी, राजाराम काशीनाथ कोळी, भगवान हिरामण वाघ, डॉ.हितेंद्र यशवंत महाजन (रा.बेंडाळे नगर, जळगाव), इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (रा.महाबळ, जळगाव), शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार, ललिता राजू सोनवणे, प्रतिभा मोतीलाल जिरी, यशवंत ओंकार जिरी, व्यवस्थापक सुकलाल शहादू माळी (सर्व रा.तळेगाव, ता.जामनेर) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४०९, ४२०,१२० ब, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक सादरे करीत आहेत. प्रमोद रायसोनींसह १३ जणांना अटकअपहाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकारी अशोक सादरे व कर्मचार्यांनी संशयित आरोपी प्रमोद रायसोनी यांना रात्री साडे तीन वाजेच्या सुमारास बळीराम पेठेतील त्यांच्या निवासस्थानी ताब्यात घेतले. त्यानंतर डॉ.हितेंद्र महाजन यांना बंेडाळे नगरातील निवासस्थानाहून ताब्यात घेतले. उर्वरित ११ जणांना दुपार पर्यंत अटक करण्यात आली आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.
सुधारित मुख्य पान एक व सेंट्रल डेस्कसाठी २६ लाखांच्या अपहारप्रकरणी प्रमोद रायसोनींसह १३ जणांना अटक दोन दिवसांची पोलीस कोठडी : संचालकांसह १५
By admin | Updated: February 3, 2015 17:15 IST