दरम्यान, निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरू ठेवत व्यवसाय करणाऱ्या १६७ आस्थापनांवर कारवाई करून १ लाख ११ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याबाबत ४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील ६५ दुकाने ही सील करण्यात आली. मनाई असतानाही रस्त्यावर आलेल्या रिक्षा, टॅक्सी व बस यांच्यावर १२ हजार ६३ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यातून १० लाख ९३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या ९०६ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ८१हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईंतर्गत संचारबंदीत ७० केसेस करण्यात आल्या असून परवानगी न घेता विवाह सोहळा घेत २५पेक्षा अधिक नातलगांच्या हजेरीमुळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात २० आरोपींविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वसूल करण्यात आलेल्या ४२ लाख ९९ हजार ६०० रूपयांची रक्कम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात जमा करण्यात आली आहे.