सुरक्षेसाठी भूषात पोलीस पाटील संघटना जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:57 PM2020-01-15T13:57:28+5:302020-01-15T13:57:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संक्रांतीनिमित्त नर्मदा नदीत पवित्र स्वानासाठी भूषा ता.धडगाव येथे भाविकांची गर्दी होते. मागील वर्षी बोट ...

Police Patil organizations will go to Bhushan for security | सुरक्षेसाठी भूषात पोलीस पाटील संघटना जाणार

सुरक्षेसाठी भूषात पोलीस पाटील संघटना जाणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संक्रांतीनिमित्त नर्मदा नदीत पवित्र स्वानासाठी भूषा ता.धडगाव येथे भाविकांची गर्दी होते. मागील वर्षी बोट उलटून स्रानसाठी आलेल्या सात भाविकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ॅविविध यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यात सुरक्षा यंत्रणेत योगदान देण्यासाठी पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी देखील संक्रांतीच्या दिवशी सकाळपासून तेथे राहणार आहे.
तीन राज्यातून वाहणाऱ्या नर्मदा नदीला धार्मिकदृट्या मोठे महत्व प्राप्त झाले आहे. धार्मिक महत्व असल्यामुळे नर्मदा परिक्रमा देखील केली जात आहे. या महत्वामुळेच संक्रांतीच्या दिवशी या नदीवर ठिकठिकाणी पवित्र स्नान देखील करण्यात येत आहे. त्यात धडगाव तालुक्यातील भूषा हे एक ठिकाण आहे. भूषा हे पवित्र स्रान करण्यासाठी भाविकांना सोयीचे ठरत असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यासह शेजारील दोन्ही राज्यातूनही तेथे भाविक दाखल होतात.
मागील वर्षाचया संक्रांतीला धडगाव तालुक्यातील तेलखेडी व खरवड येथील भाविक भूषा येथे पवित्र स्नानसाठी गेले होते. दरम्यान त्या भाविकांनी बोटमधून नर्मदेत फेरफटका मारण्याचा प्रयत्नही केला. परंतु काही कारणास्तव बोटचा तोल जात उलटले. त्यात पाच भाविकांचा जागिच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान दोन भाविकांचाही बळी गेला होता. या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी धडगाव ताललुका प्रशासनामार्फत संक्रांतपूर्व उपयायोजना करण्यात आल्या आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी भूषा येथे भेट देत तेथील सुविधांची पाहणी केली़ तर भूषा आणि खर्डी ग्रामस्थांच्यावतीने स्वच्छताही करण्यात आली आहे़ भाविकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे़
पोलीसांकडून माहिती कक्ष, रस्ते, पार्किंग यांची माहिती घेण्यात आलीआहे. यंदा या ठिकाणी किमान ५० हजारापेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने पोलीस दलाकडून विशेष उपाययोजना केली जात आहे़ शिवाय महसूल प्रशासनही येथे कर्मचारी नियुक्त करणार आहे़ आरोग्य विभागाच्या बोटींची याठिकाणी नियुक्ती होणार आहे़ यातून भाविकांसाठी फिरत्या आरोग्य पथकांची निर्मिती करण्यात आली
आहे़ गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दलाची पथके याठिकाणी १५ जानेवारी रोजी सुरक्षा यंत्रणा तैनात राहणार आहे. तर भाविकांच्या सुरक्षा व्यवस्थेत योगदान देण्यासाठी धडगाव तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे १२० पदाधिकारी व सदस्य देखील भूषा येथे सकाळपासून उपस्थित राहणार असल्याचे संघटनेमार्फत सांगण्यात आले.

४संक्रांतीच्या दिवशी होणाºया पवित्र स्रानासाठी अस्तंबा ता.धडगाव येथील कुंडालाही महत्व दिले जात आहे. ही परंपरा अलिकडील काही वर्षापूर्वीच रुढ झाली असली तरी मागील तीन वर्षांपासून संक्रांतीच्या दिवशी या कुंडावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. यंदाच्या संक्रांतीसाठी एक दिवसापूर्वीच अस्तंबा येथे भाविक दाखल झाले आहे. त्यांच्याकडून रात्रभर होणाºया भजन, किर्तन व अन्य उपक्रमांसाठी सायंकाळपर्यंत तयारी पूर्ण करण्यात आली होती. तर संक्रांतीच्या दिवशी दिवसभर तेथे महाप्रसाद, भंडारा, पंगत यासह अन्य उपक्रम पार पडणार आहे. अस्तंबा येथे जाणाºया भाविकांना कुठल्याही सुविधेची आवश्यकता भासत नाही. परंतु भाविकांची संख्या वाढल्यास तेथे पोलीस बंदोबस्त व अन्य सुविधांची गरज भासण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणेमार्फत भूषापाठोपाठ अस्तंबा येथेही आवश्यक त्या उपाययोजना होणे अपेक्षित असल्याचे भाविकांकडून म्हटले जात आहे.
४संक्रांतीला अस्तंबा येथे जाणाºया भाविकांमध्ये प्रामुख्याने अक्कलकुवा, तळोदा व नंदुरबार तालुक्यासह गुजरतमधील निझर, सागबारा, तापी आदी तालुक्यातून भाविक येत असल्याचे अस्तंबा येथील नागरिकांमार्फत सांगण्यात येत आहे. या ठिकाणी येणाºया भाविकांच्या संख्येत येत्या काही वर्षात अधिक भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजनेची गरज आहे.


४मागील वर्षी झालेल्या बोट दुर्घटनेत धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील सहा तर खरवड येथील एक अशा एकुण सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. घटनेच्या दुसऱ्या-तिसºया दिवसापासून वारसदारांचे सांत्वन करणाऱ्यांचा ओघ वाढला होता. त्यात प्रशासकीय व राजकीय क्षेत्रातील अनेकांनी भेट दिली होती. दरम्यान वारसांना मदत मिळवून देण्याची आश्वासनेही देण्यात आली होती. परंतु वर्ष उलटूनही त्या वारसदारांना कुठहीलही मदत मिळाली नाही. यासाठी वर्षभर प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असतानाही मदत मिळ शकली नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या मयतांच्या वारसदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Police Patil organizations will go to Bhushan for security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.