नंदुरबार : शहरालगत भोणे शिवारात गोडावूनमध्ये फटाक्यांचा अवैधसाठा आढळून आल्यानंतर पोलीसांनी नंदुरबारातील एकावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे़ गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पोलीसांनी गोडावूनवर छापा टाकला होता़भोणे शिवारातील शेतात पत्र्याच्या गोडावूनमध्ये शोभेच्या दारुचे फटाके अवैधरित्या साठवून ठेवल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस पथकाने त्याठिकाणी भेट देत पाहणी केली होती़ यावेळी २ लाख ५० हजार रुपयांचे फटाके पोलीसांना मिळून आले होते़ हा साठा विनापरवाना असल्याचे समजून आल्यानंतर पोलीसांंनी तो जप्त करत कारवाई केली़ याबाबत पोलीस नाईक विजय दामोदर परदेशी यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन हिमांशू रविंद्र परदेशी रा़ परदेशीपुरा, नंदुरबार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ बारीपदार्थ अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत़
फटाक्यांचा अवैध साठा केल्याप्रकरणी नंदुरबारातील एकावर पोलीस कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:00 IST