शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षासह इतर विभागातील अनागोंदी, अस्वच्छतेचे साम्राज्य, कर्मचाऱ्यांच्या ड्युटीसंदर्भातील नाराजी ही बाब ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षासह इतर विभागातील अनागोंदी, अस्वच्छतेचे साम्राज्य, कर्मचाऱ्यांच्या ड्युटीसंदर्भातील नाराजी ही बाब लक्षात घेता जिल्हा रुग्णालया व्यतिरिक्त आणखी एक नवीन कोवीड कक्ष सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर तयारीला लागले आहे. खामगाव रस्त्यावरील एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वसतिगृहात हा कक्ष आकारास येत आहे. या ठिकाणी किमान १०० बेडची व्यवस्था राहणार आहे.जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी सध्या कोवीडच्या माध्यमातून चर्चेचा विषय ठरली आहे. सुरुवातीला येथील कोवीड कक्ष आणि त्यातील सुविधा व एकुण उपचारपद्धती यामुळे हा कक्ष चांगल्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरला होता. सुरुवातीला दोन आकडी रुग्ण संख्या राहत असल्यामुळे फारसा ताण राहत नसल्यामुळे कक्षातील देखभाल आणि इतर सुविधा चांगल्या होत्या, परंतु येथील वाढणारी रुग्णसंख्या, विशिष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिली जाणारी वागणूक, त्यामुळे कर्मचाºयांमधील असंतोष, त्यामुळे कामावर परिणाम होऊन अस्वच्छतेचे पसरलेले साम्राज्य या बाबी आता समोर आल्या आहेत.अनागोंदी रुग्णांच्या मुळावरजिल्हा रुग्णालयातील अनागोंदी आता रुग्णांच्या मुळावर उठली आहे. विशेषत: कोवीड कक्षात जी खबरदारी घेतली जावी ती आता गेल्या १५ दिवसांपासून घेतली जात नसल्याची स्थिती आहे. कोवीड कक्षातच अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. शौचालय, स्नानगृहात पाणी तुंबत आहे. एकाच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, कक्षात दाटीवाटीने ठेवलेले बेड यामुळे रुग्ण कमालीचे हैराण झाले आहेत. याशिवाय रुग्णांसाठी पोषक आहार देणे आवश्यक असतांना त्याबाबतही उदासिनता आहे. दोन वेळच्या चहासाठी देखील रुग्णांना वाट पहावी लागत असल्याचे चित्र आहे.कुणाचाही ताळमेळ नाहीकोवीड कक्षातील सुविधांबाबत एकही अधिकारी नियमित या कक्षात भेट देवून पहाणी करीत नसल्याचे काही रुग्णांनी स्पष्ट केले. केवळ संबधीत सिस्टर येवून वेळ झाल्यास औषधी देत असतात. नेमण्यात आलेली डॉक्टर मंडळी सकाळी व सायंकाळी राऊंडवर येत असतात. परंतु वरिष्ठ अधिकारी येथील व्यवस्थेची पहाणीसाठी कधीही आले नसल्याचे सांगण्यात आले.कर्मचाºयांच्या जिवाशी खेळकर्मचारी देखील या ठिकाणी ड्युटी करण्यास नाखुश असतात. या ठिकाणी ६ तासांची ड्युटी केल्यावर किमान ६ ते १२ तासांची विश्रांती त्यांना देणे आवश्यक असतांना लागलीच दुसºया वॉर्डात ड्युटी दिली जाते. हा एक प्रकारे इतर रुग्णांच्या जिवाशी खळ खेळण्याचा प्र्रकार आहे. कोवीड कक्षात ड्युटीवरील कर्मचाºयाचा स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह येत नाही तोपर्यत त्या कर्मचाºयाला दुसºया वॉर्डात ड्युटी लावता येत नाही हा नियम असतांना येथे त्याला तिलाजंली दिली जात असल्याचे दिसत आहे. ड्युटी संपल्यानंतर कर्मचाºयाला पीपीई किट काढणे, त्यांचे सॅनिटायझेशन करणे, फ्रेश होणे यासाठी दुसºया कक्षाची सोय होणे आवश्यक असतांना कोवीड कक्षाच्या आवारातच त्यांना या सर्व बाबी कराव्या लागत असतात. त्यामुळे कर्मचाºयांचे कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढत आहे.

वाढणारी रुग्णसंख्या, जिल्हा रुग्णालयात कोवीड रुग्णांमुळे इतर रुग्णांमध्ये निर्माण होणारी भिती ही बाब लक्षात घेता आता जिल्हा रुग्णालया व्यतिरिक्त आणखी एक कोवीड कक्ष कार्यान्वीत होणार आहे. एकलव्य निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वसतिगृहात हा कक्ष आकाराला येणार आहे. या कक्षाची नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी पहाणी केली. पालकमंत्र्यांनी देखील आवश्यक त्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर नियोजन करण्याचे आदेश दिले. त्यामुळे किरकोळ दुरूस्तीच्या कामाला वेग आला आहे. या कक्षात १०० बेडची सुविधा होणार आहे.