शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
3
"पाती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप
4
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
5
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
6
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
7
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
8
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
9
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
10
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
11
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
12
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
13
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
14
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
15
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
16
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
17
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
18
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
19
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
20
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा

सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत घडताहेत खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:52 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तब्बल चार महिने सुरू राहिलेल्या लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे़ ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तब्बल चार महिने सुरू राहिलेल्या लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे़ यात क्रीडा क्षेत्राचा समावेश असून गेल्या महिन्यापासून खेळाडू मैदानांवर सरावांसाठी येऊ लागले असल्याचे चित्र दिसू लागले आहे़ दरम्यान हा सराव सुरू असला तो सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व शासनाचे नियमांचे पालन करुनच होत आहे़मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली त्यावेळी जिल्ह्यातील विविध भागात छोट्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार होते़ लॉकडाऊनमुळे या स्पर्धाही रद्द करुन संसर्ग रोखण्यासाठी ग्राउंडवर खेळाडूंना सराव करण्यास मनाई करण्यात आली होती़ यानंतर स्पर्धाही रद्द करण्यात आल्या़ शालेय ते राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा रद्द झाल्याने शहरातील स्पोर्टस क्लबचे सरावही बंद झाले होते़ तब्बल चार महिने बंद असलेले सरावर गेल्या महिन्याच्या मध्यापासून पूर्ववत झाल्याचे सांगण्यात आले आहे़ १ आॅगस्टपासून खेळाडू केवळ सायंकाळी येत असल्याने मैदानांवर वर्दळ दिसून येत आहे़ ४दरम्यान जिल्ह्यातील काही गुणवंत खेळाडूंसोबत संपर्क केला होता़ यातील राष्ट्रीय स्पर्धेत उंच उडीत सुवर्ण पदक प्राप्त करणारा अभय गुरव हा खेळाडू मिलीटरी स्पोर्टस क्लब पुणे येथे सराव करत आहे़ नुकताच तो पुणे येथे रवाना झाला होता़ खेळाडूंनी स्वत:ची क्षमता वाढवण्यासाठी आत्मविश्वासाने पुढील काळात स्पर्धा कराव्यात, असे त्याने सांगितले़४जिल्ह्यातील विविध भागातील खेळाडू नंदुरबार, नाशिक, पुणे येथे सराव करत स्पर्धांसाठी स्वत:ला सज्ज करत आहेत़ ४नंदुरबार शहरातील जी़टी़पाटील महाविद्यालय, यशवंत विद्यालयाचे क्रीडांगण, जिजामाता फार्मसी कॉलेजचे मैदान आणि जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडू पहाटे आणि सायंकाळी हजेरी लावत आहेत़ त्यांच्याकडून नियमित व्यायाम करण्यात आल्यानंतर आपआपल्या खेळांचा सराव सुरू करण्यात येतो़४यशवंत विद्यालयाच्या मैदानात सायंकाळी आबाजी स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंकडून टप्प्याटप्प्याने सोशल डिस्टन्सिंग ठेवत सराव केला जातो़ जीटीपी ग्राउंडवरही हेच दिसून येते़ दरम्यान काही खेळाडूंसोबत संवाद साधला असता, त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक निर्माण करण्याची मागणी केली़ राज्यात सर्वत्र सिंथेटीक ट्रॅक आहेत़ धावण्याच्या स्पर्धेला गेल्यानंतर अडचणी येत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली़शहरी भागात चार महिने खेळाडू घरात होते़ ग्रामीण भागात खेळाडू सराव करत होते़ परंतु या सर्वांनाच मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांच्या परफॉर्मन्सवर परिणाम झाला आहे़ आता खेळाडू येऊ लागले आहेत़ त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहे़ खेळाडूंची शारिरिक क्षमता ही कायम चांगली असते़ यातून ट्रॅकवर पुन्हा खेळाडू येऊ लागले असल्याचा आनंद आहे़-प्रा़डॉ़मयूर ठाकरे,क्रीडा मार्गदर्शक, नंदुरबाऱग्राउंड बंद असल्याने रग्बी आणि हॉकी संघटनांकडून विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू केले होते़ यासाठी काही परीक्षाही घेण्यात आल्या़ खेळाडू घरीच सराव करत होते़ परंतु ग्राउंडवर एकत्रित सराव करताना बऱ्याच गोष्टी समजून येतात़ ते होत नसल्याने काहींना अडचणीही येत होत्या़ आता खेळाडू येऊ लागले आहेत़ त्यातून अनेकांच्या सरावाला वेग आला आहे़-प्रा़ खुशाल शर्मा, क्रीडा मार्गदर्शक, नंदुरबाऱ